रामनगर ला रोज पाणीपुरवठा – अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या मागणीला यश.
ग्रामीण बातम्या पिंपळनेर – येथील ग्रामपंचायत पिंपळनेर मार्फत गावात रोज पाणीपुरवठा होत होता, परंतु गेल्या दहा वर्षापासून रामनगरला मात्र एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. हा भेदभाव असून, रामनगरकरांवर अन्याय आहे.
त्याबाबत अखिल भारतीय मानवाधिकार संघाने ग्रामपंचायत पिंपळनेर कडे दि. 12- 12- 19 व 18 – 7 – 22 रोजी रामनगरला रोज पाणीपुरवठा करण्याची लेखी स्वरुपात मागणी केली होती.
परंतु ग्रामपंचायतीने त्याची दखल न घेतल्यामुळे, ग्रामपंचायत पिंपळनेरच्या ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी दि.19 – 12- 22 रोजी केली .त्यानुसार मा. मुख्यमंत्री सचिवालय, नाशिक विभाग, नाशिक ,यांनी चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती साक्री यांना दिले.
त्यानुसार दि.12-4- 23 रोजी चौकशी करण्यात आली, त्यावेळी अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर चे अध्यक्ष श्री. प्रविण थोरात यांनी सदर चौकशीत –
- 1)रामनगरला रोज पाणीपुरवठा व्हावा .
- 2)पिंपळनेर गावात CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत.
- 3)पाण्याच्या टाक्या (जलकुंभ )दर महिन्याला स्वच्छ करून पाण्याची तपासणी केली जावी .
- 4)रामनगरला स्वतंत्र स्मशानभूमी व्हावी .
- 5)पांझरा नदीत नालींचे पाणी सोडून नदी प्रदूषित केली जाते ते थांबवावे.
- 6) डम्पिंग ग्राउंड साठी स्वतंत्र सोयी व्हावी.
अशा इतर अनेक समस्यां बाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी पिंपळनेर ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी रामनगरला रोज पाणीपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिले, तसेच रामनगर साठी स्वतंत्र स्मशानभूमी संदर्भात येत्या ग्रामपंचायत मासिक सभेत चर्चा करून कार्यवाही करण्यात येईल, व निधी उपलब्ध झाल्यावर पिंपळनेर गावात CCTV कॅमेरे बसवण्यात येतील
असे आश्वासन देण्यात आले. रामनगरला रोज पाणीपुरवठा सुरू झाला असून ,गेल्या 10 वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लागला आहे. शेवटी अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या मागणीला यश आले.