डोंबिवलीतील किरण शिंदे या युवकाने २६ मार्च २०२३ रोजी घाटकोपर रेल्वे स्थानकातील मुतारीसंदर्भात तक्रारवहीत रीतसर कैफियत मांडली होती.
ग्रामीण बातम्या : एक क्रमांकाच्या फलाटावर कल्याण बाजूस असलेल्या रेल्वेच्या सार्वजनिक मुतारीत १ रुपया मागितल्याबाबतची ती तक्रार होती. शिवाय नकार दिल्यावर तिथल्या देखभाल करणाऱ्या महिलेने किरण यांना शिवीगाळ केली होती. किरण यांच्या तक्रारीनुसार, सदरची महिला नशेत होती.
किरण शिंदेंना हा अनुभव सतत तीन दिवस येत होता. २९ मार्च, २०२३ रोजी त्यांनी पुन्हा आपली तक्रार नोंदवली होती. शिवाय, वारंवार तक्रार करून निवारण होत नाही, म्हणून त्यांनी समाजमाध्यमाचाही आधार घेतला होता. रेल्वेच्या ट्विटर हॅन्डलवरही त्यांनी घडला प्रकार मांडला होता आणि तिथे प्रतिसादही मिळाला.
रेल्वेच्या तक्रारीत तथ्य आढळलं.
रेल्वे पोलिस दलाच्या जवानांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली व त्यांना किरण शिंदेंच्या तक्रारीत तथ्य आढळलं. किरण शिंदेंशी उद्धटपणे वागणाऱ्या महिलेला कामावरून हटवण्यात आलं आहे. कंत्राटदार रोशनी मल्टी सर्विसेस यांना नागरिकांशी सौजन्याने वागणारा कर्मचारी वर्ग तैनात असावा, म्हणून तंबी देण्यात आली आहे. शिवाय, मुतारीची सेवा मोफत आहे, म्हणून कंत्राटदार