हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त गरजु शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप…
अविनाश देशमुख शेवगांव.
वंदनीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शेवगांव तौक षिवसेने तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. नगर दक्षिणचे जिल्हाप्रमुख मा. राजेंद्र दळवी, ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम शिवसेना शहरप्रमुख ॲड. सिद्धार्थ काटे यांच्या शहर कार्यालयात पार पडला.
वंदनीय हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त. |
या कार्यक्रमासाठी उपजिल्हाप्रमुख प्रा. शिवाजीराव काटे, तालुका संघटक महेश पुरनाळे, युवासेना तालुकाप्रमुख शीतल पुरनाळे,युवासेना शहरप्रमुख मिसाळ, प्रसिध्दी प्रमुख उदय गांगुर्डे,उपतालुकाप्रमुख पांडुरंग नाबदे, उप तालुका संघटक शामराव ठोंबरे, शाखा प्रमुख अशोक गवते युवासेनेचे किरण मगर, आकाश वांढेकर ,दादा रसाळ,सोनल वाघमारे ,अक्षय बोडखे, गटसंघटक दादासाहेब काकडे, आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. विविध सामाजिक उपक्रम राबवुन शिवसेनेचे तरुण तडफदार श्री सिद्धार्थ काटे आणि त्यांचे सहकारी यांनी स्व बाळासाहेबांची जयंती उत्साहात साजरी केली.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*
Leave a Reply