विघुत लोकपाल मुंबई चा महावितरणला दंड.

विघुत लोकपाल मुंबई चा महावितरणला दंड.

विघुत लोकपाल मुंबई चा महावितरणला दंड. मुबंई दि. 27 -5-2022. विज ग्राहकाचा खंडीत विज पुरवठा वेळेत सुरु नकेल्याने मुंबईच्या विघुत लोकपाल कार्यालयाने महावितरणला दिला दंड.

विघुत लोकपाल मुंबई चा महावितरणला दंड.

विघुत लोकपाल मुंबई चा महावितरणला दंड.

श्री माधवराव फुलचंद दोरीक (माहिती अधिकार कार्यकर्ता) रा.. बलकुवे ता. शिरपुर जि. धुळे यांचे अर्थे खुर्द येथे वेल्डींगचे दुकान असुन दिंनाक 1-8-2021 रोजी सदर दुकानाचा विज पुरवठा खंडीत असल्याचे श्री दोरीक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महावितरणकडे तोंडी व लेखी तक्रार केली.माञ महावितरणने 5-8-2021 पर्यत विज पुरवठा चालु केला नाही.त्यामुळे विज ग्राहक श्री दोरीक यांनी नंतर दि. 3-9-2021 रोजी ग्राहक तक्रार निवारण मंच नाशिक कडे तक्रार दाखल केली.

माञ सदर तक्रार परत आल्यामुळे त्यांनी तक्रार विघुत लोकपाल मुंबई यांचे कडे पाठवली विघुत लोकपाल यांनी हिच तक्रार मंचाकडे पाठवली. माञ नाशिक येथील मंचाकडे अध्यक्ष व सदस्य पद रिक्त असल्यामुळे 60 दिवसात तक्रार निकाली निघाली नाही . त्यामुळे श्री दोरीक यांनी विघुत लोकपाल मुंबई यांच्याकडे दिंनाक 11-3-2022 तक्रार दाखल केली. या तक्रारीवर दिंनाक 4-5-2022 रोजी विघुत लोकपाल मुंबई कार्यालयाने सुनावणी घेतली.

Related RTI Post :

महावितरणच्या कृतीच्या मानकानुसार विज पुरवठा खंडीत झाल्यास ग्रामिण भागात 18 तासाच्या आत विज पुरवठा सुरळीत करणे बंधनकारक आहे.

माञ महावितरणने विज पुरवठा खंडीत झालेल्या तक्रारीची दखल घेण्याची प्रकिया विहीत मुदतीत पार पाडली नाही. ग्राहकाचा विज पुरवठा महावितरणने खरोखरच 1-8-2021 रोजी चालु केला तर मग ग्राहकाचा विज पुरवठा सुरु झाल्याची खाञी करणे आवश्यक होते .तसेच ग्राहकाकडुन विज पुरवठा सुरळीत झाल्याबद्दल लेखी लिहुन घेवुन सही घेणे आवश्यक होते . 

माञ महावितरणने विज पुरवठा सुरुच केला नाही त्यामुळे ग्राहकाचा सही देण्याचा प्रश्नच राहत नाही.त्यामुळे महावितरणकडुन तक्रारदार विज ग्राहक श्री. माधवराव फुलचंद दोरीक हे कमाल 500 रुपये नुकसान भरपाईस पाञ आहेत असा आदेश विघुत लोकपाल मुंबई यांनी दिला माञ अशी रक्कम महिन्यासाठी देय असलेल्या निश्चित शुल्कापेक्षा नसावी . या प्रकरणात निश्चित शुल्क 415 रुपये आहे. त्यामुळे उपकार्यकारी अभियंता सो शिरपूर, कार्यकारी अभियंता दोडाईचा व कनीष्ठ अभियंता यांनी नियमाचे पालन न केल्यामुळे 415 रुपये ग्राहकास देण्याचे विघुत लोकपाल यांनी आदेश दिले आहेत 

दंडाची रक्कम ग्राहकाच्या येणार्‍या मासिक विज देयकातुन समायोजित करण्यात यावी.असे आदेश पारित केले. महावितरणकडुन सहाय्यक अभियंता अर्थे , मुख्य कार्यकारी अभियंता दोंडाईचा ,यांनी बाजु मांडली तर ग्राहकाच्या वतीने ग्राहक श्री माधवराव दोरीक व विज ग्राहक संघटना शेगांव तालुका अध्यक्ष श्री. अंबादास पवार शेगांव ( माहिती अधिकार कार्यकर्ता) यांनी बाजु मांडली 

 ग्राहकाने आपल्या हक्कासाठी लढा दिला पाहिजे नुकसान भरपाई किती ही मिळो माञ सदर दंडाची नोंद कर्मचारी यांच्या सर्विस बुक मध्ये होते हे महत्वाचे आहे. श्री माधवराव दोरीक विज ग्राहक.

विघुत लोकपाल मुंबई चा महावितरणला दंड PDF वाचा. 

Important Links : 

Notification (जाहिरात) येथे क्लिक करा 
Official Website (अधिकृत वेबसाईट) येथे क्लिक करा 
Join Us On WhatsApp येथे क्लिक करा
Join Us On Telegram येथे क्लिक करा
Join Us On Facebook येथे क्लिक करा
Important Pdf येथे क्लिक करा 
विघुत लोकपाल मुंबई Download PDF येथे क्लिक करा 

Related RTI Post :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !