विट भट्ट्या बंद करा व सेतू केंद्रातील ग्राहकांची लूट थांबवा.अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी.

पिंपळनेर परिसरातील अनाधिकृत विट भट्ट्या बंद करा व सेतू केंद्रातील ग्राहकांची लूट थांबवा.

अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी.

पिंपळनेर – येथील अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर, यांच्या वतीने पिंपळनेर अप्पर तहसिलचे तहसीलदार व उपजिल्हाधिकारी मा. श्री. शेळके साहेब यांना दोन निवेदन देण्यात आले .

1) पिंपळनेर परिसरातील विट भट्टीतून निघालेल्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे .त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तसेच विट भट्टी व्यवसायासाठी तालुका दंडाधिकार्‍यांची परवानगी आवश्यक आहे ,ती परवानगी अनेक व्यवसायिकांनी घेतलेली नाही. शिवाय त्याचे नूतनीकरण देखील केलेले नाही. बऱ्याच विट भट्टी मालकांनी शासनाचा महसूल बुडवला आहे .

नदीकाठच्या विट भट्टी मालकांनी एरिकेशन व ग्रामपंचायतची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु काहींनी ती घेतलेली नाही. शिवाय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा नाहरकत दाखला आवश्यक असताना तो घेतलेला नाही. अशा अनाधिकृत विटभट्ट्या त्वरित बंद करून त्यांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

2) पिंपळनेर परिसरातील सेतू केंद्रात ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे .

अशा सेतुकेंद्रांचा परवाना (लायसन्स) रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. सेतू केंद्रात ग्राहकांची फसवणूक थांबवावी म्हणून दर्शनी भागात दरपत्रक लावावे ,यासाठी यापूर्वी दि. 25- 8 -2021 रोजी निवेदन देण्यात आले होते ,त्यानुसार मा. अपर तहसीलदार सो.पिंपळनेर यांनी त्वरित दि. 25 -8-2021 रोजी सर्व सेतू केंद्रांना लेखी आदेश काढला होता, परंतु सेतू केंद्रांनी त्याची दखल न घेता आजही सर्रास ग्राहकांची लूट करत आहेत .

ग्राहकांची लूट करणाऱ्या सेतू केंद्रांचा परवाना लायसन्स रद्द करण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी अप्पर तहसील कार्यालय पिंपळनेरचे तहसीलदार (उपजिल्हाधिकारी)मा. शेळके साहेब यांना निवेदनाद्वारे करण्यात आली .

याप्रसंगी अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेरचे पदाधिकारी श्री.प्रविण थोरात ,श्री. हंसराजजी शिंदे, श्री. प्रशांत कापडणीस, श्री. किरण शिनकर, श्री. अरुण गांगुर्डे, श्री. मुकुंद खैरनार, श्री. दिनेश भालेराव ,हे उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !