विद्यार्थ्यांना’सायकल बँक’उपक्रमातंर्गत मोफत सायकलींचे वाटप |
माध्यमिक विद्यालय वडगाव ता.शहादा येथे विद्यार्थ्यांना’सायकल बँक‘उपक्रमातंर्गत मोफत २१ सायकलींचे वाटप
शहादा तालुका प्रतिनिधी:- घोडलेपाडा, कोळपांढरी येथून दररोज शाळेत पायी चालत येणाऱ्या अत्यंत गरीब व गरजू अशा २१ विद्यार्थ्यांना आज मोफत सायकली वाटप करण्यात आल्या.प्रसंगी उदघाटक म्हणून साने गुरूजी मित्रमंडळ शहादा चे अध्यक्ष माणिकभाई चौधरी हे होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून युवकमित्र परीवार संस्थेचे संस्थापक तथा सायकल बँक योजनेचे कार्यकर्ते प्रवीण महाजन,पत्रकार कल्पेश राजपूत,लायन्स क्लब ऑफ सहेलीच्या अध्यक्षा आशाताई चौधरी,शाळेचे अध्यक्ष महेंद्र काटे,घोडलेपाडा येथील शिक्षक रवींद्र बडगुजर,म्युनिसिपल हायस्कुलचे शिक्षक वसीम शेख हे उपस्थित होते.
यावेळी १०० लेखन वाचन शिकण्यासाठी मोफत सचित्र बालमित्र पुस्तके वाटप करण्यात आली.तसेच ‘सायकल बँक’योजनेची माहिती देण्यात आली.तसेच येत्या तीन वर्षात वडगाव शाळा सुसज्ज इ लर्निंग स्कुलसह स्मार्ट शाळा म्हणून विकसित करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
वडगाव येथील विद्यालयात घोडलेपाडा,कोळपांढरी येथील विद्यार्थ्यांना 3 की.मि.पेक्षा जास्त अंतर पायी चालत शाळेत यावे लागते. म्हणून घोडलेपाडा जि.प.शाळेचे शिक्षक रवींद्र बडगुजर यांनी पुणे येथील सायकल बँक चळवळीचे कार्यकर्त तथा कोठली येथील रहिवाशी प्रवीण महाजन यांच्याकडे शाळेला मोफत सायकल उपलब्ध करण्याची मागणी केली होती.त्यानुसार श्री.महाजन यांनी शाळेला मोफत २१ सायकल उपलब्ध करून दिल्या.
सायकल दुरुस्त करणेकामी शाळेचे अध्यक्ष महेंद्र काटे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Leave a Reply