ग्रामीण भागासह शहरी भागातही शबरी आवास योजना लागू. : शबरी आवास’मधून बांधा आता शहरातही टुमदार घर वंदना भामरेंच्या पाठपुराव्याला यश.
धुळे : शहरात मोठ्या संख्येने आदिवासी समुदाय वास्तव्यास आहे, परंतु ते घरकूल योजनेपासून वंचित होते. माजी नगरसेविका वंदना भामरे यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे ग्रामीण भागासह शहरी भागातही शबरी आवास योजना लागू करावी, अशी मागणी केली. सातत्याने यासाठी पाठपुरावा करत प्रयत्न सुरू ठेवले. अखेर शहरी भागासाठी ही योजना कार्यान्वित झाली असून भामरेंच्या प्रयत्नांना यश लाभले.
शबरी आवास योजना चा माहिती साठी येथे क्लिक करा
आदिवासी समाजातील बहुतांशजण आजही कुडामातीचे, कच्च्या भिंतीचे, पालाच्या झोपडीत जीवन जगत आहेत. त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता. कारण ही योजना केवळ ग्रामीण भागासाठी होती. ग्रामीण भागासह शहरी भागही या योजनेत समाविष्ट करावा, अशी विनंती वंदना भामरे यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे केली.
त्याचप्रमाणे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली व अखेर संपूर्ण आदिवासी लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज संपूर्ण महाराष्ट्रातील शहरात राहणाऱ्या लाभार्थी आदिवासी समुदायाचा गांभीर्यपूर्वक विचार करून निर्णय घेत संपूर्ण आदिवासी जनतेला न्याय दिला आहे.
शबरी आवास योजना चा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
याबद्दल भामरे यांनी आभार मानले आहेत. तर मनपा हद्दवाढीला ११ गावांसहित शहरातील आदिवासी समुदायाने वंदना भामरे यांचे आभार मानलेत. या योजनेसंदर्भात अधिक माहिती पाहिजे असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भामरे यांनी केले आहे.
Leave a Reply