ग्रामीण बातम्या | शबरी आदिवासी घरकुल योजना महाराष्ट्र संबंधित संपूर्ण माहिती योजनेचे उद्दिष्ट्य, लाभ, अनुदान, पात्रता, कागदपत्रे, प्रस्ताव जमा कुठे करायचा या संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत. तुम्हीही अनुसूचित जमाती मधील आदिवासी प्रवर्गात मोडत असाल, आणि तुम्हाला या योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर ही माहिती नक्की वाचा.
शबरी आदिवासी घरकुल योजना ही महाराष्ट्र आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी पक्के घर उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्ट्याने अमलात आणली गेली आहे. या योजेतंर्गत आदिवासी लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यात स्वतंत्र आर्थिक मदत देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. सन २०११ च्या सर्वेक्षणानुसार या योजनेसाठी आदिवासी समुदाय पात्र आहे आणि त्यांना लाभ दिला जातो.
Related Post.
आदिवासी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करताना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा ग्रामीण विकास यंत्रणा योग्य ती कार्यवाही करून मंजुरी देण्यात येतात.
शबरी आदिवासी घरकुल योजने अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना स्वतःची राहण्यासाठी पक्की घरे नाहीत, त्यांना पक्की घरे उपलब्ध करून देणे. आदिवासी लोक हे मातीच्या घरात, झोपडित आणि तात्पुरत्या केलेल्या निवाऱ्यात राहतात त्यांना राहण्यासाठी पक्का निवारा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असून.
- हेही वाचा : Online प्रधान मंत्री घरकुल आवास योजना फोर्म कसा भरावा. लिंक.
- प्रधान मंत्री घरकुल योजनेचे ड यादी पहा लिंक.
शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी जमातीतील कुटुंबांना नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य सरकारकडून देण्यात येते. सदर घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी १.२० लाख रुपये इतकी आर्थिक मदत शबरी महामंडळ या कडून करण्यात येतो. तसेच मनरेगा माध्यमातून या लाभार्थ्यास रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात आला आहेत.
शबरी आदिवासी आवास योजनेसाठी लाभार्थी पात्रता :-
- १) लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा.
- २) लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागासाठी एक लाख, नगर परिषदांसाठी दीड लाख आणि महानगर पालिकासाठी दोन लाख असणे आवश्यक आहे.
- ३) लाभार्थ्याकडे राहण्यासाठी पक्के घर नसावे.
- ४) पात्र लाभार्थ्याकडे स्वतःची घर बांधण्यासाठी जमिन किंवा शासनाने दिलेली जमीन असावी.
- ५) निराधार, अपंग, विधवा या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
- १) आधार कार्ड.
- २) बँक पासबुक.
- ३) सातबारा उतारा आणि ७-अ.
- ४) वयाचा पुरावा.
- ५) जॉब कार्ड.
- ६) ग्रामसभेचा ठराव.
- ७) सध्या कर भारत असल्याची पावती किंवा पोच.
- ८) रेशन कार्ड.
- ९) मतदान कार्ड.
- १०) जात प्रमाणपत्र.
- ११) दोन पासपोर्ट फोटो.
शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी प्रस्तावासोबत वरीप्रमाणे कागदपत्रे जोडून नेमलेल्या यंत्रणेकडे किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या पत्त्यावर संपर्क करून जमा करावे… अशा प्रकारे शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ ग्रामीण क्षेत्रातील गरजू आदिवासी लाभार्थी घेऊ शकतो…
अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती, केंद्र सरकारच्या आणि
राज्य सरकारच्या शासकीय योजनांचा लाभ घ्यायच्या असेल तर माहिती जाणून घ्या तसेच आम्ही दररोज शासकीय योजनांची माहिती
दिलेल्या ग्रुप वर शेअर करीत असतो. तर आताच लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा.
Telegram
: Link
Facebook
: Link
Leave a Reply