जामण्यापाडा येथे ६२ कुटुंबांना रेशनकार्डचे वाटप विलास पावरा ग्रामपंचायत सदस्य यांचे विशेष प्रयत्न.
शिरपूर: तालुक्यातील मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर असलेल्या जामण्यापाडा गावातील ६२ कुटुंबांना रेशनकार्ड गावातील जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते वाटप करण्यात आले.
जामण्यापाडा गावातील कुटुंब मागील २०-२५ वर्षांपासून अत्यंत आवश्यक अशा रेशनकार्ड पासून वंचित होते. रेशनकार्ड नसल्याने अनेक शासकीय योजनांपासून वंचित होते. विलास पावरा व गेंद्या पावरा यांनी त्यांना रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालय येथे संपर्क साधून सप्टेंबर २०२१ साली अर्ज भरून पुरवठा विभाग तहसील कार्यालयात जमा केले. दोन वर्षांनंतर त्यांना यश आले आणि रेशनकार्ड मिळवून घेतले. रेशनकार्ड बनवून देण्यासाठी विलास पावरा ग्रामपंचायत सदस्य व गेंद्या पावरा युवक काँग्रेस शिरपूर तालुका अध्यक्ष यांनी परिश्रम घेतले.
नवीन रेशनकार्ड धारक कुटुंब यांनी तहसीलदार महेंद्र माळी, तत्कालीन पुरवठा निरीक्षक प्राजक्ता सोमवलकर, पुरवठा अधिकारी अपुर्णा वडुळकर, समाधान पाटील यांचे आभार मानले.
यावेळी भिना पावरा, गमेश पावरा, मोहनसिंग पावरा, भावसिंग पावरा, कैलास पावरा, रमेश पावरा, लखनसिंग पावरा, रामलाल पावरा, वेरसिंग पावरा, वेरसिंग पावरा, राजू पावरा आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.