श्रीराम मंदीर न्यास शेवगांव च्या “राम ईनाम” मधील भाडेकरुना नोटिसा थकलेले भाडे भर नाहीतर जागा खाली करा?.
{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
शेवगांव शहरातील श्रीराम मंदीर न्यास च्या गट नंबर 1313 / 1314 / व 1315 मधील सुमारे 32 एकर जागेसुमारे 86 च्या आसपास असणाऱ्या भाडे करूना थकलेले गेल्या चार पाच वर्षांपासूनचे भाडे भरा नाहीतर येत्या 15 दिवसांत जागा खाली करा गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये प्रांत साहेब पाथर्डी – शेवगांव व ऑक्टोबर 2022 मध्ये जिल्हाधिजारी कार्यालय अहमदनगर यांनी श्रीराम मंदीर न्यास शेवगांव च्या राम ईनाम छटा भूखंडावरील अनधिकृत बेकायदेशीर बांधकामे त्वरित पाडण्याचे निर्देश विश्वस्त मंडळाला दिले होतें व त्यावर तहसीलदार शेवगांव याना लक्ष घालण्याचे आदेश दिले होते.
परंतु मंदीर विश्वस्त यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवत भाडेकरूंना थकलेल्या भाड्याची नोटीस गेल्या 13 एप्रिल 2023 रोजी काढुन नवीन लिव्ह अँड लायसन च्या प्रमाणे नवीन रेडि रेकनर प्रमाणे बाजारमूल्य प्रमाणे भाडे आकारण्यास सुरवात केली आहे.
गेली कित्येक वर्षे रस्ते का माल सस्तेमे यां उक्ती प्रमाणे कोट्यावधी रुपये किंमत असलेली जागा वर्षाला काही हजार विश्वस्त मंडळींना देऊन चकटफू आपले व्य्सवसाय करत होतें परंतु नवीन करार लिव्ह अँड लायसन ने वापरात असलेल्या जागेची मालकी हक्क भाडेकरूंना मिळत नसल्याने जागेचे भाडे डायरेकट प्रति Squere Foot प्रमाणे भाडे आकारल्याने फुकटात जागा ढोपरणाऱ्यांचे डोळे पार पांढरे व्हायची वेळ आली आहे. काही भाडेकरू महसुल च्या उताऱ्यावरून उडाले काही नगरपरिषदेच्या उताऱ्यावरून उडाले काहींनी यां भाड्याच्या जागेत आपली स्वतःची कोटीच्या कोटी रुपयांची मालमत्ता बांधुन ठेवली आहे.
त्यात विश्वस्त आता महिन्याला हजरो रुपये भाडे भरा नाहीतर जागा खाली करा अशी नोटीस देत आहेत तेल गेलं तुप गेलं हाती धुपाटणे आलं असं झालं ( काहींनी दीर्घ मुदतीचे करार नियम धाब्यावर बसून काही हजार फुट चे बांधकाम करून ठेवले त्यात उताऱ्यावरून नाव गायब आणि घरमालक म्हणतो भाडं वाढवून दया )
ताजा कलम.
एकीकडे शेवगांव शहरातील बाजारपेठेत 10×10 फुटाच्या गळ्याला पाच ते दहा हजार रिपये महिना भाडे सुरु असुन श्रीराम मंदीर न्यास ची हजारो फुट जागा दर वर्षी दोन ते पाच हजार देऊन वाटी लावत होतें अब आया उंट पहाड के नीचे विश्वस्त ऍक्शन मोड मध्ये आल्याने ‘ धरलं तर चावतंय आणि सोडलं तर धावतंय” अशी अवस्था राम ईनाम जागेतील भाडेकरूंची झाली आहे.
क्रमशः.
“आगे दुकान पीछे मकान” काही चाणाक्ष भाडेकरूंची अफलातुन खेळी यां अनधिकृत लोकाना वीज आणि नळ कनेक्शन मिळते कसे???*
अविनाश देशमुख शेवगांव*
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*