शेवगांव नगरपरिषदेच्या माजी झालेल्या नगरसेवकांची परस्पर विरोधी भुमिका जिल्हाधिकारी नगर यांच्याकडे स्थगिती दया म्हणुन निवेदन आज नगरपरिषदेला त्वरित योजना मार्गी लावा म्हणुन पत्र सत्तेत आणि विरोधात व पदावर असताना सर्वांचे पाणीप्रश्नी मौन पद गेल्यावर सर्वांनाच शेवगांवच्या जनतेचा कळवळा?
शेवगांव नगरपरिषदेच्या योजना त्वरित मार्गी लावा. |
{ अविनाश देशमुख शेवगांव } *9960051755*
काल 18 जानेवारी रोजी नगरपरिषद चे माजी पदाधिकारी आणि माजी नगरसेवक यांनी शेवगांवची नियोजित पाणी योजना त्वरित मार्गी लागावी म्हणुन निवेदन दिले. अन्यथा त्रीव्र आंदोलन पुकारू असे निवेदन दिले याचं नगरसेवकांनी गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे मुख्याधिकारी आणि प्रशासक आम्हाला विचारात नाहीत आमचे मतं विचारात घेतल्या शिवाय पाणी योजना कार्यान्वित करू नये अशी मागणी केली होती पंधरा दिवसांत अशी काय जादु झाली.
तेच नगरसेवक योजना लवकरात लवकर मार्गी लागावी म्हणुन येत्या 26 जानेवारीला आंदोलन करण्याचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी याना दिले याचं लोकांनी गेल्या महिन्यात हे टेंडर रद्द करून पुन्हा नव्याने प्रक्रिया रावबवण्याची वेळखाऊ मागणी केली होती आता अशी काय जादु झाली की तेच लोक शेवगांव नगरपरिषद च्या मुख्याधिकार्यांना कामं त्वरित चालु करा नाहीतर आंदोलन करू अशी मागणी करत आहेत.
“गंगाधर हि शक्तिमान है’ आणि “डाल मे कुछ कला है” काहीतरी “अर्थपूर्ण” आहे!
*ताजा कलम.
*माजी नगरसेवकांच्या यां परस्पर विरोधी भूमिकेची चर्चा शहरास तालुक्यात सुरु आहे वास्तविक शेवगांवला नागरपरिषद झाल्यावर पहिले पाणी योजना व्हायला पाहिजे होती परंतु तत्कालीन नगरसेवकांनी प्राधान्याने रस्ते अंडरग्राउंड गटारी स्ट्रीट लाईट हि कामे केली आता ‘वराती मागुन घोडे” सर्व रस्ते आणि गटारी खंदून नवीन पाणी योजनेचे सर्व पाईप गावात टाकणार का??? “एक कामं दोनदा आणि ताकात पाणी तीनदा”
*क्रमशः
*शेवगांव पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांनी सरकार नसताना {आघाडी सरकारच्या काळात } आणि सत्ता आल्यावर { शिंदे फडणवीस सरकार च्या काळात } सातत्याने पाठपुरावा केल्याने कोट्यवधींचा निधी शेवगांव शहरासाठी आला हे उघड सत्य आहे.
Leave a Reply