शेवगाव पंचायत समितीच्या डॉ.सुरेश पाटेकर यांची सहायक गट विकास अधिकारी पदी पदोन्नती नियुक्ती.

शेवगाव पंचायत समितीच्या डॉ.सुरेश पाटेकर यांची सहायक गट विकास अधिकारी पदी नेवासा  पदोन्नतीवर नियुक्ती.

शेवगाव पंचायत समितीचे आरोग्य विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर यांची  पंचायत समिती नेवासा येथे महाराष्ट्र विकास सेवेत सहायक गट विकास अधिकारी पदी पदोन्नतीने पदस्थापना   ग्रामविकास मंत्रालयाचे आदेशानुसार झाली आहे.

श्री पाटेकर यांनी आरोग्य विभागात ३० वर्षे सेवा केली असून त्यांनी कोविड महामारी प्रतिबंधक उपाययोजना,कोविड लसीकरण  मोहीम,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान, यशवंत पंचायत राज अभियान, कुटुंब कल्याण अभियान,पल्स पोलिओ लसीकरण मोहीम, साथरोग प्रतिबंधक उपाययोजना, कुपोषण निर्मूलन मोहिम,लेक वाचवा अभियान, रक्त दान शिबीर,मोतीबिंदू तपासणी व सर्वरोगनिदान शिबीर आयोजन, आमचा गाव आमचा विकास आराखडा मोहीम,आपत्ती व्यवस्थापनात पुरग्रस्त भागात काम, साथरोग नियंत्रण कार्यक्रम,जनगणना मोहीम, सार्वत्रिक निवडणूका या राष्ट्रीय कार्यक्रमांत प्रभावीपणे काम केले असून त्यांना जिल्हा परिषदेने आदर्श आरोग्य विस्तार अधिकारी पुरस्कार  व दोन आगावू वेतनवाढीसह दोन  कालबध्द पदोन्नतीचा लाभ देऊन गौरविण्यात आले आहे.

शेवगाव पंचायत समितीच्या डॉ.सुरेश पाटेकर यांची सहायक गट विकास अधिकारी पदी नेवासा  पदोन्नतीवर नियुक्ती.
 डॉ.सुरेश पाटेकर 


पाटेकर यांनी अहमदनगर जिल्हा परिषद सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी म्हणून प्रभावीपणे काम केले आहे.पाटेकर यांचे आरोग्य पत्रिका व वर्तमान पत्रात आरोग्य विषयक लेख प्रसिद्ध झाले असून अहमदनगर आकाशवाणीवर आरोग्य विषयक जनजागृतीवर कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेतील अधिकाऱ्यांना प्रथमच महाराष्ट्र विकास सेवेत पदोन्नतीची संधी मिळाली आहे. पाटेकर यांनी आरोग्य  उपकेंद्र बाभळेश्वर, आखेगाव, ढोरजळगाव व पंचायत समिती विटा (सांगली), राहुरी व शेवगाव येथे सेवा केली आहे.

*अविनाश देशमुख शेवगाव* 

*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !