श्री डॉ.पुरुषोत्तम आमरण अन्नत्याग उपोषणाचा आज ८ वा दिवस.

आमरण अन्नत्याग उपोषणाचा आज ८ वा दिवस.

उपोषणकर्ता : श्री डॉ.पुरुषोत्तम दुर्योधनजी सदार

घरकुल पात्र लाभार्थी : सौ नंदा साहेबराव सोनोने

ठिकाण : ग्रामपंचायत कार्यालय टवलारच्या समोर.

घरकुलास पात्र लाभार्थ्यांस न्याय देउन तातडीने पहिला हफ्ता त्याच्या खात्यात जमा करावा.
आमरण अन्नत्याग उपोषणाचा आज ८ वा दिवस.


( गाव – टवलार, ता.अचलपूर, जि.अमरावती )

दिनांक : १५/०६/२०२२ पासून उपोषण सुरू आहे.

उपोषणकर्त्याच्या मागण्या :

१) घरकुलास पात्र लाभार्थ्यांस न्याय देउन तातडीने पहिला हफ्ता त्याच्या खात्यात जमा करावा.

२) पात्र घरकुल लाभार्थ्याविरूध्द ग्रामपंचायत टवलारने खोटा ठराव घेउन पात्र लाभार्थ्यांस लाभापासुन वंचित ठेवले म्हणून ग्रामपंचायत टवलारच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या विरूध्द तात्काळ बरखास्तीची कारवाई करावी.

३) तत्कालीन सचिव श्री योगेश उमक यांनी खोटा ठराव घेतल्या प्रकरणी त्यांना तात्काळ निलंबित करावे.

गटविकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांनी या विषयाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिलेले परंतु *जर चौकशी अहवालात वंचित लाभार्थ्याला न्याय व दोषींवर कारवाई झाली नाही तर चालू असलेले उपोषण सुरूच राहणार आहे.

गटविकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांनी उपोषणकर्त्याच्या तिन्ही मागण्या मान्य करून चौकशी अहवाल द्यावा अन्यथा संपूर्ण यंत्रणेविरूध्द उपोषण सुरू होइल.

युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !