समशान भूमी चे काम त्वरित पूर्ण न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयात अंत्यसंस्कार : ग्रामस्थांचा इशारा तीन वर्षापासून काम अपूर्ण.
समशान भूमी चे काम त्वरित पूर्ण करा. |
वाशिम : रिसोड तालुक्यातील कोयाळी बु सर्व मागासवर्गीय वस्तीमधील समशान भूमी चे काम मागील तीन वर्षापासून अपूर्ण आहे याबाबत संबंधित भागातील नागरिकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व सुमन पंथ यांना निवेदन सादर करणे हे काम पूर्ण करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान सध्या पावसाळा सुरू असताना या काळात कोणाचे निधन झाले असून मृतदेहावर ग्रामपंचायत कार्यालयात अंत्यसंस्कार केले जातील असा इशारा युवा गर्जना संघटनेचे अध्यक्ष गजानन वानखेडे यांनी दिला आहे.
समशान भूमी चे काम गेल्या तीन वर्षापासून अपूर्ण
कोयाळी बु येथील मागासवर्गीय वस्तीमधील समशान भूमी चे काम गेल्या तीन वर्षापासून अपूर्ण असल्याचे येथील बांधवांना अंत्यसंस्कार वेळी अनेक अडचणींना सामना करावा लागतो त्यामुळे त्यांनी ग्रामपंचायत सचिव, सरपंच,उपसरपंचासह पंचायत समिती सदस्यांकडे ही समस्या मांडून समशान भूमी चे काम करण्याची मागणी अनेकदा केली.
ग्रामपंचायत कडून या समशानभूमी साठी हलगर्जीपणा.
परंतु त्यांच्याकडून अद्याप कोणतेही सहकार्य करण्यात आले नाही सकारात्मक उत्तरही मिळत नाही ग्रामपंचायत कडून या समशानभूमी च्या कामात हलगर्जीपणा केला जात असून निधी उपलब्ध असताना देखील तीन वर्षापासून काम अपूर्ण ठेवल्याची तक्रार येथील समाज बांधवांनी केली आहे.
समशान भूमी चे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी.
ती दखल घेण्याची मागणी या समशान भूमी चे काम त्वरित पूर्ण करून आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी कोयाळी येथील मागास वस्ती मधील नागरिकांच्या वतीने युवा गर्जना संघटनेचे अध्यक्ष गजानन आनंदा वानखेडे रतन वानखेडे सुमित दत्ता वानखेडे गोपाल भिसडे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यांनी तातडीने दखल घ्यावी अशी अपेक्षा या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Leave a Reply