चि. कार्तिक प्रकाश शिंदे ची MPSC तर्फे सहाय्यक नगररचनाकार या पदावर निवड.
पिंपळनेर – सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ व जयदया शिक्षण प्रसारक मंडळ सामोडे चे माजी अध्यक्ष कै. दादासाहेब दयाराम काशिराम शिंदे यांचे नातू व श्री. प्रकाश दयाराम शिंदे यांचे चिरंजीव कार्तिक प्रकाश शिंदे BE (Civil) याचे MPSC तर्फे सहाय्यक नगररचनाकार या पदावर निवड झाली आहे.
MPSC तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत चि.कार्तिक ने महाराष्ट्रात 17 वा, व ओ बी सी मधून 7 व्या क्रमांकाने निवड झाली.त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे पदाधिकारी व सामोडे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. हंसराजजी दयाराम शिंदे यांचा चि.कार्तिक हा पुतण्या आहे. चि. कार्तिकला अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Leave a Reply