अखेर सामोडे चौफुली ते कालिका माता मंदिर, येथील रस्त्याला प्रचंड खड्डे पडलेले रस्त्याला कामाला सुरवात झाली, अखिल भारतीय मानवाधिकार संघाच्या मागणीला यश,
पिंपळनेर — येथील सामोडे चौफुली ते कालिका माता मंदिर या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले होते. हा सिमेंट काँक्रीट रस्ता बनवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी देखील मिळाली.
सदर रस्त्याची एक बाजू जेसीबीने खोदून ठेवण्यात आली, पण काही दिवसांपासून काम थांबवण्यात आले होते. पावसामुळे चिखल , रस्त्यावर पडलेले खड्डे व अर्धवट रस्ता खोदून ठेवल्यामुळे वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे वाहन चालकांना खूपच मनस्ताप सहन करावा लागत होता.
याबाबत अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर चे अध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ साक्री तालुका चे कार्याध्यक्ष श्री. प्रविण थोरात यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी दोन वेळा फोनवर संपर्क साधला, दोन ते तीन दिवसात कामाला सुरुवात करतो असे आश्वासन मिळाले.
पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. शेवटी श्री. प्रविण थोरात यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे येथील कार्यकारी अभियंतांशी दोन दिवसांपूर्वी फोनवर तक्रार केली व लवकरात लवकर कामाला सुरुवात न झाल्यास वरिष्ठांकडे लेखी तक्रार करण्यात येईल, अशी समज दिल्यावर आज सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय मानवाधिकार संघ व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मागणीला अखेर यश आले.
Leave a Reply