Breaking News : सार्वजनिक ठिकाणी आपण व्हिडीओ किंवा रेकॉर्डिंग करण्यात कसल्याही प्रकारचा गुन्हा नाही. त्यामुळे आपल्यावर किंवा कुणावरही अन्याय होत असेल तर त्याचा पुरावा निर्माण करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिकरित्या जन्मतः बहाल झालेला आहे. त्यामुळे असे कार्य हे कृत्य ठरत नाही तर एक सामाजिक किंवा व्यक्तिगत हितसंबंध जोपासना करणारे कार्य आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनाने एक पत्र निर्गमित केले आहे.
हे परिपत्रक वाचून घ्यावे, आपल्या सोबत नेहमी ठेवा, उच्च न्यायालयाचे आदेशाची लिंक पोस्टच्या शेवटी दिलेली आहे.
परिपत्रक
दिनांक:- १३/०६/२०२३
विषय:- पोलीस ठाण्यामध्ये व्हीडीओ रेकॉर्डींग संबंधाने.
मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूर येथे दाखल क्रिमीनल अॅपलीकेशन नं. ६१५/२०२१ मध्ये मा. न्यायालयाने दिनांक २६/०७/२०२२ रोजी आदेश पारीत केला आहे की, केंद सरकार द्वारे पारित अधिकृत गुपिते (ऑफिशियल सिक्रेट्स) कायदा १९२३ चे कलम २ (८) मध्ये परिभाषित केल्यानुसार ‘निषिद्ध ठिकाण’ ची व्याख्या प्रासंगिक आहे. ही एक सर्व समावेशक व्याख्या आहे, ज्यात विशेषतः पोलीस ठाणेचा समावेश, ठिकाणे किंवा आस्थापना पैकी एक म्हणून केला जात नाही.
त्याअनुषंगाने क पोउपआ/ मुख्या/ परिपत्रक / २०२२ – २१९ दिनांक २८/१२/२०२२ रोजी अन्वये परिपत्रक काढण्यात आले होते परंतु असे निदर्शनास आले आहे की, पोलीस ठाणे येथे आलेल्या व्यक्तिींनी व्हीडीओ रेकॉर्डींग करताना दिसून आल्यास कर्तव्यावरील अधिकारी / अंमलदार त्यांचेशी वाद घालतात आणि गुन्हा नोंद करतात ही अत्यंत खेदाची बाब आहे. पोलीस ठाणे हे सार्वजनिक स्थळ असून पोलीस ठाणे मध्ये येणारे व्यक्तिींनी व्हीडीओ रेकॉर्डींग केल्यास त्यास अडकविण्याचा प्रयत्न करू नये.
हेही वाचा : देशातील सर्व पोलीस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला शासन निर्णय.
करीता पोलीस ठाणे मध्ये येणाऱ्या व्यक्तींनी व्हिडीओ रेकॉर्डींग केल्यास गुन्हा नोंद करता येत नाही, असे मा. न्यायालयाने आदेशीत केलेले आहे तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यानी मा. न्यायालयाचे आदेशाची प्रत सर्व पोलीस अधिकारी / अंमलदार यांना वितरीत करून सदरची बाबही त्यांच्या निदर्शनास आणुन द्यावी. तसेच अधिकृत गुपिते (ऑफिशियल सिक्रेट्स) कायदा १९२३ अन्वये गुन्हा नोंद करतांना मा. न्यायालयाचे आदेशाचे तंतोतंत पालन करावे. (मा. पोलीस आयुक्त यांचे आदेशान्वये )
(डॉ. अश्विनी पाटील)
पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), नागपूर शहर
Telegram Group Link
Facebook Group Link
Leave a Reply