शेवगांव आणि पाथर्डी तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानात माल ठेवायला जागा शिल्लक नाही.
अविनाश देशमुख शेवगांव.
गेल्या दोन महिन्यापासुन नगर जिल्यातील अहमदनगर राहुरी पारनेर पाथर्डी शेवगांव कर्जत आदी ठिकाणी खुळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा तांदुळ वाहने पकडली जवळजवळ डझनभर गुन्हे दाखल झाले त्यामुळे रेशन माफियांनी खरेदी बंद केली त्यामुळे कचचा माल तसाच पडुन आहे.
त्यामुळे यां रॅकेट मध्ये सहभागी असल्याची चांगलीच कोंडी झाली आहे. सरकार माल द्यायचे थांबवेना आणि गाड्याची धरपकड सुरु असल्याने शेकडो टन माल ठेवायचा कुठे अशी पंचायत झाली आहे “दुःख सांगता येईना आणि सहन हि होईना” बिचाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांची अवस्था केविलवाणी झाली आहे.
माल आहे पण वाटता येईना पॉस मशीनवर नेमके कोणत्या महिन्याचे थांब घेतले जाते तेही कळत नाही ‘सगळा कारभारा मुकीला ले हाक ना बोंब” असा झाला आहे. आता पुरवठा विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी *स्टॉक चेक करायला काही हरकत नाही अनेक “स्वस्त धान्य दुकानदारांचे वाजले की बारा असे होईल” एरव्ही चिरी मिरी साठी स्वस्तधान्य दुकान तपासणी करणारे पार गपगार झाले आहेत*
ताजा कलम.
महाराष्ट्र शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे मोफत आणि विकत दोन्हीही धान्य आता ग्राहकांना मोफत म्हणजे फुकट मिळणार आहे “एक रुपया सुद्धा दुकानदाराला द्यायचा नाही चकटफू माल घेऊन यायचा” एक महिन्यात दोनदा ताकात पाणी तीनदा “अब आया उट पहाड के नीचे” अहमदनगर जिल्हा पुरवठा विभागाने तालुक्याचे आमदार आणि खासदार यांनी यां सगळ्या प्रकरणात लक्ष घालणे गरजेचे आहे
क्रमशः
स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2022 चे मालाचे चलन भरून घेतले त्याचे काय????
*अविनाश देशमुख शेवगांव. सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*
Leave a Reply