हवामान विभागाच्या अहवालातील माहिती वीज, वादळी पावसामुळे देशभरात १ हजार ५८० मृत्यू.
पुणे : अतिवृष्टी, पूर, वादळी पाऊस आणि विजा अशा कारणांनी गतवर्षी देशभरात २ हजार ७७० जणांचा मृत्यू झाला. त्यांपैकी १ हजार ५८० मृत्यू वीज पडून तसेच वादळी पावसामुळे झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात सर्वाधिक ५८० मृत्यू उत्तर प्रदेशमध्ये झाले असून, महाराष्ट्रात २४० मृत्यू झालेत.
भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाने २०२२चा हवामान अहवाल नुकताच जाहीर केला. या अहवालात गेल्या वर्षभरातील पाऊस, तापमानासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात
कर्नाटकात सर्वाधिक पाऊस पडला. कर्नाटकात दीर्घकालीन सरासरीच्या.
१३८ टक्के पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल राजस्थानमध्ये २३६ टक्के तेलंगणात १३५ टक्के पाऊस पडला. त्या वेळी ईशान्येकडील राज्यांमध्ये कमी पाऊस झाल्याचे दिसून येते मिझोराममध्ये केवळ ७४ आहे. टक्के आणि मणिपूरमध्ये ७५ टक्के पाऊस पडला.
तापमानात वाढ
गेल्या १०० वर्षांतील तापमानाच्या तुलनेत देशभरातील काही राज्यातील तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सर्वाधिक १.५ अंश सेल्सिअस तापमान हिमाचल प्रदेशात वाढले. त्या खालोखाल गोव्यात १.४४ अंश सेल्सिअस, केरळमध्ये १०५ अंश सेल्सिअस तापमान अधिक नोंदवले गेले.
गोवा, गुजरात आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या अधिक पावसाचा कल दिसून येत आहे, तर अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि बिहारमध्ये कमी पावसाचा कल दिसून येत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले
या अहवालातील माहितीनुसार, २०२२ मध्ये देशभरात झालेल्या २
हजार ७७० मृत्यूंपैकी १ हजार ५८० मृत्यू वीज आणि वादळी पावसामुळे झालेत. एक हजार ५० मृत्यु पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेत तर उष्णतेची लाट, धुळीचे वादळ अशा कारणांनी अन्य मृत्यू झालेत. उत्तर प्रदेशमध्ये ५८९. बिहारमध्ये ४१८, आसाममध्ये २५८, महाराष्ट्रात २४०, ओडिशामध्ये १९४ मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
O
Leave a Reply