Today History : १५ ऑगस्ट भारतीय ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. / १५ ऑगस्ट भाषण मराठीत Speech लिहून देत आहे आवडल्यास इतरांना हि शेअर करा.. / 15 August Speech In Marathi
भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट ( Independence Day of India – 15″ August) : व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी हळूहळू संपूर्ण भारताची राजकीय व्यवस्था काबीज केली. ब्रिटिश लोक भारतीय राजकीय व्यवस्था ताब्यात घेऊन थांबले नाहीत, तर जवळपास १५० वर्षे यशस्वीपणे भारतीय भूमीवर त्यांनी राज्य केले. द्वितीय महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्ताधिशांच्या विरोधात भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत चाललेला होता.
Independence Day of India In Marathi |
तसेच द्वितीय महायुद्धाच्या काळात भारतीय साम्राज्यावरचे आपले राज्य आणि द्वितीय महायुद्ध हे आपल्याला सांभाळता येणार नाहीत, हे ब्रिटिशांच्या लक्षात आलेले होते. त्यामुळे इंग्लंडच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारताला स्वातंत्र्य देण्याची हमी दिलेली होती. परंतु अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या जोखडातून भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा करण्यात आली. या घोषणेबरोबरच भारत आणि पाकिस्तान असे दोन नवीन राष्ट्र जगाच्या नकाशावर उदयास आले.
१५ ऑगस्ट का साजरा केला जातो?
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला. त्यामुळे दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट या दिवशी भारताला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यामुळे दरवर्षी हा दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय स्वातंत्र्य दिन – अर्थ :
१५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन ब्रिटिशांच्या गुलामगिरीतील भारताचा शेवटचा दिवस त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याची एक अनोखी देणगी ठरलेला आहे. १५ ऑगस्ट १९४७ पासून भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यामुळे ब्रिटीशांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण भारतावर राहिले नाही. १५ ऑगस्ट हा भारतातील एक महत्त्वाचा ‘राष्ट्रीय सण’ तसेच उत्सव आहे.
या दिवशी ध्वजारोहणाचा प्रमुख कार्यक्रम भारताची राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर संपन्न होतो. या दिवशी लाल किल्ल्यावर भारतीय पंतप्रधानांच्या हस्ते भारताचा राष्ट्रध्वज फडकावला जातो. याप्रसंगी भारतीय राष्ट्रध्वजाला २१ तोफांची सलामी दिली जाते. यावेळी भारताचे पंतप्रधान संपूर्ण भारतीयांना उद्देशून भाषण करतात.
१५ ऑगस्ट लाल किल्ल्यावर ध्वजारोहण विशेष माहिती .
१५ ऑगस्ट लाल किल्ल्यावर ध्वजारोहण |
थोडक्यात लाल किल्ल्याच्या साक्षीने भारतीय स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. त्याचप्रमाणे संपूर्ण देशभरात ध्वजारोहण, विविध मिरवणुका व सांस्कृतिक देशभरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालय विविध संस्था इ. मध्ये ध्वजारोहण करून भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जाते, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अशा सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक, नेते व देशभक्तांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केले जाते:
१५ ऑगस्ट भाषण मराठी. Speech In Marathi
महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसेच्या मार्गाने केलेले चलेजाव आंदोलन त्याचप्रमाणे सविनय कायदेभंगाची चळवळ, भारतीय राष्ट्रीय कांग्रे केलेली संपूर्ण स्वराज्याची घोषणा, विविध क्रांतिकारक, देशभक्त यानी ब्रिटिशांविरोधात केलेल्या विविध कारवाया, विविध ज्ञात-अज्ञात देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या कार्यामुळे तसेच आपल्या प्राणाची आहुती दिल्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ हा भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण दिन सर्व भारतीयांना अनुभवायास मिळाला.
भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी देशासाठी आपले बलिदान दिले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु भारतीय स्वातंत्र्याची घोषणा करताना म्हणाले होते की, “At the stoke of the midnight hour, when the world sleep, India will awake to life and freedom. A moment comes but really in history, when we step out from old to the new… India discovers herself again.” पंडित नेहरू यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या या भाषणातून भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला मोठा संघर्ष, त्या संघर्षाचा प्रवास जगासमोर स्पष्ट करून भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्याचे घोषित केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला दरवर्षी भारताचे महामहीम राष्ट्रपती राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. त्याचप्रमाणे १५ ऑगस्ट या दिवशी लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण केल्यानंतर भारतीयांना संबोधित करतात. या दिवशी लाल किल्ल्यावर सैनिकी पथसंचलन मोठ्या उत्साहात केले जाते. सैनिकी पथ संचलनाची सलामी पंतप्रधानांकडून स्विकारली जाते. १५ ऑगस्ट २०२१ पासून भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव (७५ वर्षे) साजरा केला जात आहे.
१५ ऑगस्ट ७५ वर्ष अमृतमहोत्सव कार्यक्रम.
१५ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव ७५ वर्ष (७५ वर्षे) आहे. म्हणून या वर्षभरामध्ये शासनामार्फत विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. यामध्ये विशेषतः ‘हर घर झंडा’ हा उपक्रम १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबविण्यात आलेला आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण भारतभर घरोघरी भारतीय तिरंगा ध्वज फडकविण्यात आलेला आहे.
भारतीय राष्ट्रध्वजातील प्रतीक आणि लक्षणीय प्रगती.
भारतीय स्वातंत्र्याच्या या ७५ वर्षामध्ये भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण अशा विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती केलेली आहे. संरक्षण व विकासासाठी भारताकडे आण्विक साठादेखील आहे. या सर्व घटकांच्या मदतीने भारत जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारतीय राष्ट्रध्वजातील भगवा, पांढरा आणि हिरवा रंग विविध बाबींचे प्रतीक म्हणून वापरण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रध्वजातील भगवा रंग सामर्थ्याचे प्रतीक, पांढरा रंग शांततेचे प्रतीक, तर हिरवा रंग सुबत्तेचे प्रतीक आहे.
भारतातील तरुण पिढीला भारतीय स्वातंत्र्याची जाणीव व्हावी, या तरुण पिढीला आपल्या देशासाठी लढणाऱ्या क्रांतिकारक, देशभक्त, महापुरुषाचे कर्तृत्व पूर्णरूपाने माहीत व्हावे, त्याचबरोबर भारतातील तरुणांमध्ये अधिकाधिक देशभक्ती जागृत व्हावी, यासाठी दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात ‘स्वातंत्र्य ‘दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. प्रत्येक देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. म्हणूनच भारताने १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री ब्रिटिश राजवटीच्या जूलमी, अन्यायकारक शृंखला तोडून स्वातंत्र्य प्राप्त केल्यामुळे ती रात्र प्रत्येक भारतवासीयासाठी उत्सवाची रात्र ठरली.
हेही वाचा : 👇👇👇
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा उद्देश :
१) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान दिलेल्या देशभक्त, क्रांतिकारक, महापुरुष तसेच सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आणि त्यांना आदरांजली अर्पण करणे.
२) भारतातील तरुण पिढीला भारतीय स्वातंत्र्याची जाणीव करून देणे.
३) भारतातील तरुणांमध्ये अधिकाधिक देशभक्ती जागृत करणे.
४) भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारे व आपल्या प्राणाची आहुती देणारे क्रांतिकारक, देशभक्त, स्वातंत्र्यवीरांच्या कार्यकर्तृत्वाची भारतीयांना माहिती देणे..
५) भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांना उजाळा देणे.
६) भारतीय स्वातंत्र्य पर्वाचा सन्मान करणे.
७) सामर्थ्यशाली भारताचे जगाला दर्शन घडवणे.
८) महत्प्रयासाने मिळालेल्या भारतीय स्वातंत्र्याचा आणि तिरंगा ध्वजाचा सन्मान करणे.
९) विविधतेमधून एकतेचे दर्शन घडवणे.
15 ऑगस्ट बद्दलच्या ९ मनोरंजक गोष्टी,
- द्वितीय महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्ताधिशांच्या विरोध
- १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या जोखडातून भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा .
- भारत आणि पाकिस्तान असे दोन नवीन राष्ट्र .
- भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वतंत्र झाला.
- १५ ऑगस्ट या दिवशी भारताला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त .
- भारताची राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण.
- भारतीय राष्ट्रध्वजाला २१ तोफांची सलामी दिली जाते.
- ध्वजारोहण करून भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना
- संपूर्ण देशभरात ध्वजारोहण, विविध मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रम.
15 ऑगस्ट निबंध.