10 रुपये घेऊन पळाला चहावला, रेल्वेने केले परत..

या देशाचे जागरूक नागरिक म्हणून तुमचे काय अधिकार आणि कर्तव्ये आहेत, हे या सोबतच्या दोन उदाहरणांनी समजून घ्यावे!

 दि.01/01/2023 रोजी तिरुपती रेल्वे स्टेशन येथून कोल्हापूर ला परत येण्यासाठी हरिप्रिया एक्सप्रेस चे बुकिंग होते. आम्ही 7 व्यक्तींपैकी 6 व्यक्तींची तिकिटे कन्फर्म होती. ऑनलाइन तिकीट कन्फर्म नसतांना प्रवास केला तर without ticket चाच फाईन लागतो, म्हणून एक जनरल तिकीट काढण्या साठी दुपारी 3.30 ते 4.00 वाजे दरम्यान तिरुपती स्टेशन वरील तिकीट खिडकी क्र.7 वर गेलो असता त्यांनी संध्याकाळी 7 वाजता बोलावले(तसा नियम आहे असं सांगून). मी संध्याकाळी 7 वाजता गेलो असता पुन्हा थोड्या वेळाने येण्यास सांगितले.

कारण विचारले असता त्या खिडकी वरील ऑफिसर ने बोलणे टाळले, तिकीट न देण्याबद्दल मला लेखी द्या अशी विचारणा केल्यानंतर त्या व्यक्तीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि तुला काय करायचे ते करून घे तिकीट नाही देत जा. अश्या पद्धतीने बोलून शिवीगाळ केली. अनेक विनवणी करूनही ती व्यक्ती काहीही प्रतिसाद देत नव्हती, शेवटी हताश होऊन मी माझ्या परिवारातील इतर सदस्य Waiting Area मध्ये बसलेले होते त्या ठिकाणी आलो.


व रेल्वे हेल्पलाईन 139 वर रीतसर तक्रार नोंदवली. व तक्रार नंबर नोट करून ठेवला, ट्रेन येण्याची वेळ जवळ येत होती पण माझ्याकडे अजूनही तिकीट नव्हते व माझ्या तक्रारीचा काहीही followup आलेला नव्हता,


त्याच वेळी या आधी दुसऱ्या एका प्रकरणात *श्री.अजयजी भोसरेकर सर* यांनी twiter या सोशियल मीडिया प्लॅटफॉर्म चा सुयोग्य वापराबाबत मोलाचे मार्गदर्शन केले होते. ती घटना आठवली आणि लगेच मी ट्विटर वर IRCTC official यांना टॅग करून वरील सर्व घटना टाकली व तक्रार नंबर ही मेंशन केला व माझा संपर्क क्रमांकही,त्याच पोस्ट मध्ये काही नामांकित न्युज चॅनेल्स ला सुद्धा टॅग केले., दुसरे ट्विट श्री.अश्विनी वैष्णव(मा. रेलमंत्री.)यांना टॅग करून केले.


आणि काय आश्चर्य पुढील अवघ्या 7-10 मिनिटात माझ्या मोबाईल वर रेल्वे चे कंट्रोलिंग इन्स्पेक्टर यांचा कॉल आला.त्यांनी सर्व प्रकरणा बाबत विचारणा केली.तसेच मी स्टेशनवर असलेले exact location विचारले व मी उभा असलेल्या ठिकाणी त्यांचा एक प्रतिनिधी पाठवला, त्या प्रतिनिधी ने मला त्यांच्या सोबत येण्याची विनंती केली. मी त्यांच्या सोबत गेलो असता ते मला त्याच तिकीट खिडकी वर घेऊन गेले, संबंधित व्यक्ती ला मला तिकीट देण्यास सांगितले व झालेल्या गैरसोयी बद्दल माफीही मागितली.


मला तिकीट मिळाले की नाही याची खात्री त्यांच्या प्रतिनिधी कडून करून झाल्या नंतर पुन्हा कंट्रोलिंग इन्स्पेक्टर यांनी मला वयक्तिक फोन करून तिकीट मिळाल्या बद्दल खात्री केली व दिलगिरी व्यक्त केली. एवढेच नव्हे या नंतरही मला रेल्वे च्या 3 वेगवेगळ्या ऑफिसर्स चे कॉल आले व त्यांनीही तिकीट मिळाल्या बद्दल खात्री केली.


वरील सर्व पोस्ट चा खटाटोप करण्या मागचा हेतू हा *ग्राहक जागरूकता* हा आहे. आपण ग्राहक-नागरिक म्हणून जागरूक राहिलो तर आपल्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात दाद मागू शकतो *ही जागरूकता माझ्यात या ग्रुप चे सर्वच सन्माननीय सदस्य व विषेश करून मा. अजयजी भोसरेकर सर यांच्या मुळे आली आज *मा. अजयजी भोसरेकर सर* यांनी 2-3 वर्षा पूर्वी मला केलेले मार्गदर्शन आज एवढ्या दिवसांनी देखील परत माझ्या कामात आले. म्हणून त्यांचेही खूप खूप आभार.

आपलाच 

श्री.अभिजीत भोसले

कन्नड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !