दहिवद येथील टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च महाविद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा
शिरपूर (धुळे) – प्रतिनिधी,
दि. १५ ऑगस्ट: 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन निमित्त या दिवशी दहिवद येथील टि.एस.बी. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल रिसर्च महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन सोहळा अगदी उत्साहात पार पाडला. शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अगदी सकाळी ७ वाजताच शाळेच्या प्रांगणात उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ध्वजारोहणाची सर्व तयारी केली. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी टि.एस.बी महाविद्याल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. भाग्यलक्ष्मी बाविस्कर यांच्या हस्ते भारत माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
सकाळी सात वाजून ३० मिनिटांनी गुणवंत विद्यार्थी यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि विद्यार्थ्यांनी गार्ड ऑफ ऑनर घेतला. यानंतर विद्यार्थ्यांनी अनेक भाषणे, गाण्यांचे व नृत्याचे नमुने सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धीरज बाविस्कर यांनी स्वातंत्र्य भारतासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या महान वीर आत्म्यांचे कार्य आत्मसात करून देशाला अधिक वैभवाकडे नेण्यासाठी व देशासाठी आपण सदैव तयार राहिले पाहिजे असा संदेश दिला. प्रा . डॉ, तुषार साळुंके यांनी मुख्य अतिथींचे व इतर सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे आभार मानले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. भाग्यलक्ष्मी बाविस्कर, संस्थेचे सचिव व कॉलेज चे प्राचार्य डॉ. धीरज बाविस्कर संचालिका सौ. मानसी बाविस्कर, प्राचार्य डॉ. तुषार साळुंके, प्रा. स्वप्नील पाटील, नम्रता माळी, नितीन पाटील, सुभरसिंघ राठोड, विशाल माळी, अतुल चौधरी, वैशाली पाटील, अर्चना वाडीले, धर्मजित पावरा, महिमा पाटील, सुनैना धनगर, रितिका माळी, हेमंत बोरसे, जगन पावरा, कपिल साळुंखे, ईश्वर पावरा, गुड्डू पावरा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.
- 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन / Today History 15ऑगस्ट
- हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड करा ( Har Ghar Tiranga Certificate Download )
Leave a Reply