18 लाख चोरीला गेलेला रस्ता. |
टोकडे, ता मालेगाव जि नाशिक येथील सुमारे अठरा लाख रुपये किमतीचा रस्ता चोरी प्रकरणी आज गट विकास अधिकारी मालेगाव जितेंद्र देवरे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत शाखा अभियंता डि. व्ही. इंगळे, विस्तार अधिकारी महाले, ग्रामविकास अधिकारी बी. एन. पाटील व तक्रारदार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष विठोबा द्यानद्यान हे उपस्थित होते तक्रारीच्या अनुषंगाने द्यानद्यान यांनी रस्ता झाला नसल्याबाबत बाजू मांडली असता संबंधित शाखा अभियंता यांनी रस्ता झाल्याचे नमूद केले.
हेही वाचा : भ्रष्टाचार केल्यास थेट गुन्हा दाखल.
त्यावर द्यानद्यान यांनी गावांतर्गत झालाच नसल्याबाबत खुद्द ग्राम विकास अधिकारी यांचा लेखी खुलासा सादर केला. तसेच पूर्वीप्रमाणे संबंधित चौकशी अधिकारी गावाबाहेरील कोठला तरी खाजगी शेती मालकीचा रस्ता दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतील.
त्यावर गटविकास अधिकारी यांनी सदर रस्ता हा शासकीय जागेवर झाल्याबाबतचे दोन दिवसात जागेचे उतारे ग्रामविकास अधिकारी यांना सादर करण्याचे आदेश दिलेत. व दोन दिवसानंतर गटविकास अधिकारी हे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि प नाशिक यांना अहवाल सादर करतील.
आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यासाठी तक्रारदार द्यानद्यान, शाखा अभियंता, ग्राम विकास अधिकारी टोकडे येथे गेले असता द्यानद्यान यांनी बाहेरचा रस्ता दाखवून भ्रष्टाचारी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्याची तक्रारीत उपस्थित केलेली शंका खरी निघाली.
शाखा अभियंता यांनी गावापासून एक ते तीन किलोमीटर लांब नागरी वस्ती नसलेल्या ठिकाणचा रस्ता दाखवून प्रकरण दडपण्याचा लांच्छनास्पद प्रयत्न केलाच. कामाच्या प्रशासकिय मान्यतेत दिलेल्या अटीनुसार 15 वित्त आयोगातुन होणारा रस्ता गावा अंतर्गतच तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, किंवा ग्रामपंचायत मालकिच्या जागेवरच होण अपेक्षित आहे. संबंधित अभियंता यांनी जागा ही शासकीय व ग्रामपंचायत कडे निहित केल्याची खात्री झाले नंतरच प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला.
सोबतच्या व्हिडिओ मध्ये अभियंता अक्षांश रेखांश बाबत बोलत आहेत. काम मंजूर करताना अक्षांश रेखांश बघणारे खुद्द अभियंता असूनही गावांतर्गत होणारा रस्ता हा गावाबाहेर एक ते तीन किलोमीटर अंतरावर गेला कसा अक्षांश रेखांश वरती गाव वसले आहे का?
ही बाब तपासण्याची जबाबदारी कोणाची?
प्रकरण दडपण्यासाठी गावा आतील रस्ता दाखवण्याऐवजी गावापासून सुमारे 3 किमी अंतरावरील व फक्त 8 ते 10 फुट रूंद व एकच किमी लांब खाजगी रस्ता दाखवून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
तक्रारदार यांनी जो गावा अंतर्गत रस्ता चोरीला गेला आहे तो दोन किलोमीटर लांब व सुमारे 17 फूट रुंद असा आहे. अभियंता यांना बिल अदा करताना हा विषय लक्षात आला नाही का? जनतेच्या पैशातून जनतेच्या सोयी सुविधा साध्य होण्यासाठी सरकार काम करत असते.
तर मग या कामातून किती लोकसंखेच्या जनतेचे हित साध्य होणार आहे?
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक.. Click
येत्या 15 आॕगष्टपूर्वी चोरी गेलेला रस्ता सापडला नाही तर 15 आॕगष्टपासुन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फे उपोषण करण्याचा एका निवेदनाद्वारे लेखी इशाराही महासंघातर्फे देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष विठोबा द्यानद्यान, साहेबराव वाघ, पंकज पाटील, प्रदिप पहाडे, आदिंच्या सह्या आहेत.
Leave a Reply