100, 200, चा मुद्रांक बंद : लागणार 500 चा मुद्रांक

100, 200 off stamps; 500 will have to be taken

100, 200 off stamps; 500 will have to be taken शंभर, दोनशेचे मुद्रांक बंद; 500 चा मुद्रांक घ्यावा लागणार मंत्रिमंडळाचा निर्णय : सामान्यांना बसणार तीव्र आर्थिक झळ

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांचा पाऊस पाडत असल्याने आर्थिक घडी विस्कटल्याने १००, २०० रुपयांचे मुद्रांक बंद करण्याचा निर्णय शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घेतला आहे. परिणामी शंभर रुपयांच्या मुद्रांकावर होणाऱ्या कामासाठी ५०० रुपयांचा मुद्रांक खरेदी करावा लागणार आहे.

परिणामी एका मुद्रांकामागे ४०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. महायुतीच्या लोकप्रिय योजनांची सपाट्याची थेट झळ सामान्यांच्या खिशाला बसत असल्याचे समोर येत आहे.

मुख्यमंत्री लाडका भाऊ, आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा अशा योजना सरकार राबवत आहे. यासाठी दर महिन्याला कोट्यवधींचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडत आहे. परिणामी निधींची कमतरता पडत असल्याने सरकार उत्पन्न वाढीसाठी विविध निर्णय घेत आहे.

उत्पन्नवाढीसाठीच शासनाने आता १०० आणि २०० रुपयांचे मुद्रांक बाद ठरवले आहेत. कोणतेही व्यक्तिगत किंवा अन्य दस्त नोंदणीसाठी आवश्यकतेनुसार १००, २०० रुपयांचे मुद्रांक शुल्क भरून दस्तऐवेज नोंदणीकृत करता येत होता. आता पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत.

कशासाठी लागतात 500 चा मुद्रांक

  1. प्रतिज्ञापत्रे,
  2. संचकारपत्र,
  3. वाटणीपत्र,
  4. पतसंस्था कामी,
  5. लग्न नोंदणीवेळी,
  6. भाडे,
  7. सामंजस्य करार प्रतिज्ञापत्र,
  8. जमीन खरेदी करिता,
  9. विक्री व्यवहाराचे प्रतिज्ञापत्र,
  10. करारपत्र,
  11. बँक,
  12. न्यायालय कामकाजासाठी.

प्रतिज्ञा पत्रा करीता मुद्रांक शुल्क माफ स्टॅम्प पेपर विकत घेण्याची गरज नाही 2004 चा आदेश. साध्या कागदावर प्रतिज्ञा पत्र सरकारी कार्यलय, न्यायालय येथे द्यावें.

2004 चा आदेश वाचावा (500 will have to be taken)

ग्राहकांनो सरकारचा महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागाकडील अधिसूचना /१६३६/प्र.क्र.४३६/म -१ दिनांक ०१/०७/२००४आदेश आहेत् की ( 100, 200 off stamps; 500 will have to be taken )

  • जात प्रमाणपत्र,
  • उत्पन्न प्रमाणपत्र,
  • वास्तव्य प्रमाणपत्र,
  • नावात बदल असल्यास,
  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,

तसेच शासकीय कार्यालयांत, न्यायालय, समोर दाखल करायचे ईतर सर्व प्रतिज्ञा पत्रावर आकारनी योग्य मुद्रांक शुल्क माफ केले आहेत असे आदेशात स्पस्ट केले आहेत.

वरील कामा करीता मुद्रांक स्टॅम्प पेपर विकत घेण्याची आवश्यकता नाही.

दहा हजारांहून अधिक मुद्रांक सध्या लागतात ?

• शहरात २५० ते ३०० दस्त लेखनिक आहेत. यांच्याकडे आणि

जिल्ह्यातील दस्त लेखनिक यांच्याकडून रोज कमीत कमी पाच ते सहा मुद्रांक शंभर रुपयांचे घेऊन जातात. याशिवाय बँका व इतर ठिकाणांहूनही मुद्रांक खरेदी केली जाते.

रोज सुमारे १० हजारांहून अधिक शंभर रुपयांचे मुद्रांक विकत घेऊन वापरले जातात. हेच प्रमाण राहिले तर रोज दहा हजार जणांना ५०० रुपयांचे मुद्रांक खरेदी करावे लागले तर ४०० रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.

हेही वाचा,:

सेतु केंद्र व स्टॅम्प वेंडर यांच्याकडून होणारी लूट थांबवा : Setu Kendra V Stamp Vendor

एक नंबर ग्रामपंचायत नमुने 1 ते 33 फाईली संबधित माहिती. / Gram panchayat नमुना

500 will have to be taken

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !