9 ऑगस्ट आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्या संदर्भात निवेदन. |
आजच समाज पार्टीचे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस संदर्भात माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन.
संयुक्त राष्ट्र संघाने नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
जगातील वेगवेगळ्या देशांमधील आदिवासी समाज उपेक्षितांचे जीवन जगत आहे गरिबी, अज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी आदिवासी समाज ग्रासलेला आहे या सर्व समस्यांच्या विळख्यातून त्याला बाहेर काढण्याच्या हेतूने संयुक्त राष्ट्र संघाने नऊ ऑगस्ट 1994 पासून 9 ऑगस्ट हा आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून जगभर हा दिवस आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो.
आदिवासीबहुल जिल्हा पालघर.
पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून घोषित आहे असे असताना पालघर जिल्ह्यात माननीय डॉक्टर किरण महाजन उपजिल्हाधिकारी पालघर यांनी दिनांक 2 ऑगस्ट 2022 ते 15ऑगस्ट 2022रोजी पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3)1973 अन्वये पालघर जिल्हा (वसई वगळून )मनाई आदेश लागू केला आहे. हा पालघर जिल्ह्यातील आदिवासी लोकांवर अन्यायकारक तसेच अपमानजनक बाब आहे असे मा. अशोक दादा शिंगाडा, महाराष्ट्र उपाध्यक्ष, आजाद समाज पार्टी
मा. राजन सोनावणे, जिल्हाध्यक्ष
मा. गणेश कलींगडा,जिल्हाध्यक्ष(ग्रा. ) यांनी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी पालघर यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून दिली व लेखी निवेदन दिले.
त्याने आम्हाला आश्वासन दिले की 9ऑगस्ट हा तुमचा हक्काचा दिवस आहे तुमच्या महोत्सवामध्ये कुणीही अडथळा आणणार नाही फक्त तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनला तुमच्या कार्यक्रमासंदर्भात लेखी पत्र द्या आणि कार्यक्रम तुम्ही तुमच्या पद्धतीने परंपरेने उत्साहाने साजरे करा.
हेही वाचू शकता.
UNO द्वारा घोषित किया गया दिन. 9 अगस्त विश्व् मूलनिवासी दिवस…. लिंक.
मी आपणास विनंती करतो की आपल्या स्थानिक पोलिस स्टेशनला कार्यक्रमासंदर्भात पत्र देऊन मोठ्या उत्साहाने, आनंदाने, आणि परंपरेने समाजाला गालबोट न लागता जागतिक आदिवासी दिवस साजरा करावा.
हूल जोहार, जय आदिवासी जय बिरसा, जय भीम
आपला समाज बांधव अशोक दादा शिंगाडा
Leave a Reply