शेवगाव नगरपरिषद निवडणुक स्पेशल दणका मोडला झारीतील शुक्राचार्यांचा मणका.
नगरपरिषदेची निवडणुक तिसऱ्यांदा पुढे ढकलल्याने आजी माजी भावी नगरसेवक नाराज!! |
शेवगाव नगरपरिषदेची निवडणुक तिसऱ्यांदा पुढे ढकलल्याने आजी माजी भावी नगरसेवक नाराज!!!
आचारसंहिता लागु झाल्या पासुन तें निवडणुक पुढे ढकलण्याच्या दरम्यान शहरात मोठ्या उलथापालथी अंधारात अनेक युत्या आघाड्या नेते अंधारात?
{ अविनाश देशमुख शेवगाव }
गेल्या दोन अडीच वर्षांपासून चातक पक्षाप्रमाणे नगरपरिषद निआवडणूकिची वाट पाहणाऱ्या हौश्या गवश्या आणि नवश्या अश्या सगळ्याच आजी माजी आणि भावी नगरसेवकांची गोची निवडणुक आयोगाने करून टाकली
मागील वर्षी वॉर्ड रचना आरक्षण हरकती मतदार यादी आणि उद्घोषणा पर्यंत आली आणि कोरोनाने घात केला आणि आणि यांवर्षी शिंदे सरकार निवडणुक आयोगाने तोंडातला घास काढुन घेतला ज्या लोकांनी
निवडणुकीच्या आधी तोंडाला फेस येईपर्यंत कट कारस्थाने करून प्रभाग रचना मतदार यादीतील घोळ पार गल्ली पासुन तें नगर नाशिक मार्गे मुंबई पर्यंत घोळ घातले.
तें सपशेल तोंडावर आपटले काहींनी आपल्या पक्षातील नेत्यांना अंधारात ठेऊन रात्री अपरात्री बैठका घेऊन तेरे आठ मेरे आठ और महेमान को आठ ठरवुन पण टाकले पण निवडणुक आयोगाने एका झटक्यात टांगा पलटी आणि घोडे फरार करून टाकले असो वरून कीर्तन आतुन तमाशा सगळ्या गावाने उघड्या डोळ्यांनी पाहिला
*ताजा कलम*
आता थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि जुनी वॉर्ड रचना अनेकांच्या पोटात गोळा आणणारी आहे फेब्रुवारी 2020 पासुन आजपर्यंत काही खर्च करून दमले काही कार्यकर्त्यांना सांभाळुन सांभाळून दमले.
काही वाटाघाटी तडजोडी आणि कुरघोडी करून दमले राष्ट्रवादी भाजपा तिसरी आघाडी पाहुण्या रावळ्यांची आघाडी शिवसेना म.न.से. वंचित बहुजन आघाडी गावकरी आणि ईतर छोटे छोटे पक्ष सगळेच अंग झटकून कामाला लागले.
काहींनी पार आशा सोडुन दिली *आता तिसऱ्या वेळेस परत वॉर्ड रचना आरक्षण आणि मतदार याद्याआणि हरकती इजा बिजा आणि आता तिजा…….
*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*
Leave a Reply