wwwकृषी केंद्र चालकास सोयाबीनचे बोगस बियाणे देणे पडले महागात. |
सोयाबीनचे बोगस बियाणे देणे पडले महागात.
हिंगोली सोयाबीनचे बोगस बियाणे देणे एका कृषी केंद्र चालकास कंपनीला चांगलेच महागात पडले पिकाचे नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपये व तक्रारीचा खर्च तसेच झालेल्या त्रासाची कोटी 25 हजार रुपये देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे या निकालामुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांना चांगलाच चाप बसला आहे.
हिंगोली येथील कमला नगरातील भगवान राहुजी कांबळे यांना त्यांच्या मूळगावी धानोरा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथे एकत्रित कुटुंबामध्ये आठ एकर शेती आहे त्यांनी 2017 2018 मध्ये हिंगोलीतील ज्योती ऍग्रो कॉर्पोरेशन दुकानातून व श्री अग्रो सीडस कॉर्पोरेटर कंपनीचे 335 सोयाबीनच्या सहाव्या खरेदी केल्या त्यावेळी त्यांनी दिग्रस वाणी येथील सुनिल खंदारे यांच्या नावे पावती बनवली पेरणीनंतर पिकाचा शेंगा लागल्या नाहीत त्यामुळे कांबळे यांनी कंपनीच्या कस्टमर केअर शी व कार्यालयात संपर्क साधून नुकसान भरपाईची मागणी केली मात्र नुकसान भरपाई देण्यात आली नाही त्यामुळे कांबळे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्ये तक्रार दाखल केली.
– पीक नुकसानभरपाईचे 1 लाख 9 टक्के व्याजाने द्यावेत!
– शारीरिक व मानसिक त्रासापोटी 20 हजार द्यावेत!
– तक्रारींचा खर्च म्हणून 5 हजार 45 दिवसांत देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत.
वैयक्तिक रित्या अथवा संयुक्तरित्या नुकसान भरपाई द्यावी.
तक्रार दाखल झाल्यानंतर आहे का मार्फत कृषी दुकान व बियाणे कंपनीस नोटीस पाठवण्यात आली तसेच मत मांडण्यासाठी संधी देऊनही दोघांनीही जबाब दाखल केला नाही त्यामुळे कांबळे यांनी तक्रार दोघांनाही मान्य आहे असे गृहीत धरून तसेच कागदपत्रांची पडताळणी करून तक्रार मंजूर करण्यात आली तसेच बियाणे विक्रीत दुकानदार व कंपनीचे वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या पीक नुकसान भरपाई म्हणून तक्रारदार यांना एक लाख रुपये 19 जून 2019 पासून दर साल दर शेकडा प्रमाणे होणाऱ्या व्याजासह द्यावेत तसेच शारीरिक व मानसिक त्रास आपटी 20000 तक्रारीचा खर्च पाच हजार रुपये पंचवीस हजार द्यावेत आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आत्मसात भरपाई द्यावी अन्यथा सर्व रकमेवर दंड व व्याज दोन टक्के दर शेकडा याप्रमाणे अतिरिक्त व्याज वसूल करण्यात येईल असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने अध्यक्ष आनंद जोशी व सदस्य जे ए सावळेश्वर कर यांनी दिला तक्रारकर्त्या कडून ॲड. राम सावडे यांनी काम पाहिले.
शेतकरी राजा जागा हो, जागरूक हो चला आता जागरूक होऊयात! आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये यांना जागे करूयात, स्वाभिमानाने जगुयात!
● ग्राहकमंचाविषयी माहिती पुढे दिलेल्या लिंकवरून मिळेल.
● ग्राहक मंचाची कार्यालये कुठे आहेत, त्यांचे पत्ते, फोन नंबर याविषयीची माहिती पुढील लिंकवरून मिळेल.
Leave a Reply