चौकशीत सहा लाखांचा भ्रष्टाचार उघडकीस फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी. ग्रामसेवक जीवन कोल्हे यांना तात्काळ निलंबित करा.
ग्रामसेवक जीवन कोल्हे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल
नागपूर जिल्हा अंतर्गत हिंगणा तालुका येथील ग्रामपंचायत शिरूळ चे ग्रामसेवक जीवन कोल्हे यांनी केलेल्या 6 लाख रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने नागपूर जिल्हा परिषद चे सीईओ यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
विकास अधिकारी गट-अ पंचायत समिती हिंगणा यांनी उपरोक्त विषयान्वये कडे दिनांक 10 मे दोन हजार बावीस रोजी चौकशी अहवाल सादर केला. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत शिरूर येथील ग्रामसेवक जीवन कोल्हे यांनी सामान्य फंडातून रक्कम बँकेत जमा न करता तब्बल सहा लाख 31 हजार 183 रुपयांचा अपहार केला आहे ही रक्कम त्यांनी स्वतःच्या खर्चाकरिता वापरली असे प्राथमिक चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
Related News Post :
- ग्रामपंचायत जन्म दाखला विनंती अर्ज कसा लिहावा नमुना. / Gram Panchayat Birth Certificate
- ग्रामपंचायत अतिक्रमण तक्रार अर्ज कसा करावा.
- ग्रामपंचायत विवाह नोंदीचा दाखला विनंती अर्ज कसा लिहावा नमुना. / Gram Panchayat Marriage Certificate
परिणामी आता जीवन कोल्हे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे त्याच प्रकारे यांनी. मागासवर्गीयांच्या निधीदेखील अखर्चित ठेवला असून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका समितीने ठेवला असून वर्ष 2021 2022 या आर्थिक वर्षात विजय गोविंदराव सावरकर यांचे ई निविदा मंजूर झालेले आहे निधी तेथील सिमेंट दराबाबत इनटेक्स 245 रुपये सहित 113. 60 दर निविदा मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
ई -निविदा मंजूर. फौजदारी गुन्हा दाखल
सदर साहित्य खरेदी करून ई – निविदा मंजूर करण्यात आलेल्या आहेत सदर साहित्य खरेदी करू नये निविदा दरानुसार सदर खरेदीची रक्कम करून करणे आवश्यक आहे वरील रक्कम जास्त रकमेचे शोधून 70 हजार 419 रुपये तसेच परस्पर खर्च करून पाच लाख 60 हजार 764 रुपये असे एकूण त्यांनी सहा लाख 31 हजार 183 रुपयांचा अपहार केल्याने ते प्राथमिक चौकशी अहवालात कायदेशीर दोषी आढळलेले आहेत.
भ्रष्टाचार अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल
त्या भ्रष्टाचार अपहार प्रकरणी ग्रामसेवक जीवन कोल्हे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ योगेश कुंभेजकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करीत या निवेदनाची दखल घेऊन झालेल्या प्रत्येक कार्यवाहीबाबत एक प्रत महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघटनेच्या देण्यात यावे अशी मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी केले आहे.
या ग्रामसेवकाची सुरुवातीपासून ची चौकशी करावी!
ग्रामसेवक जीवन कोल्हे यांनी सन 2019 सन 2022 त्या कालावधीत ग्रामपंचायत शिरूर येथे कार्यरत असताना तब्बल सहा लाख 31 हजार 183 रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत आढळून आले आहे कोल्हे यांची सहा लाख भ्रष्टाचार प्रकरणी अलीकडच्या एका वर्षात उघडकीस येऊ शकते तर त्यांनी यापूर्वी केलेल्या दहा वर्षात किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असावा. अशी शंका व्यक्त करीत ग्रामसेवक मंत्रालयाच्या नव्या आदेशानुसार भ्रष्टाचारी ग्रामसेवकाच्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासून ची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
Important Links :
Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |
Join Us On Facebook | येथे क्लिक करा |
येथे क्लिक करा | |
Download PDF | येथे क्लिक करा |
Related Informational Post :
Leave a Reply