जिल्हा न्यायालय विनंती अर्ज कसा करावा : कोर्टात केस असो किवा जिल्हा न्यायालय मध्ये अनेक वेळेस काही कारणास्तव आपल्याला मोफत वकील मिळत नसतात म्हणून मोफत वकील मिळावा म्हणून, जिल्हा न्यायालय विनंती अर्ज कसा करावा म्हणून तुमच्या साठी नमुना अर्ज देत आहे. चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया.
जिल्हा न्यायालयात विनंती अर्ज कसा करावा / |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण म्हणजे काय? :
महाराष्ट्र राज्यात चार खंडपीठ आहेत, ह्या चारही खंडपीठात जिल्हा न्यायालय म्हणजे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे. लोकांना न्याय मिळत नसल्याने ह्या जिल्हा न्यायालय मध्ये आपली दाद मंगू शकता. आणि म्हत्वाचे असे कि जिल्हा विधी सेवा म्हणजे लोक अदालत आहे. जे कि कोर्टात केस लढण्यासाठी लोकांनकडून वकीले पैसे घेत असतात तर ह्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्ये लोकांना मोफत वकील दिला जातो. मोफत वकील हवा असेल तर आम्ही जिल्हा न्यायालयात विनंती अर्ज नमुना देत आहोत.
भारतात मोफत वकील कसा मिळेल?
न्यायालयात केस लढण्यासाठी किंवा इतर काही कारणासाठी मोफत वकील हवा असल्यास तुम्हाला नक्कीच मोफत वकील मिळेल. तो म्हणजे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण द्वारे. त्या साठी जिल्हा न्यायालयात विनंती अर्ज करावा लागेल.
सरकारी वकील भारतात खाजगी खटले घेऊ शकतात का?
उच्च न्यायालयात विशेष केस लढण्यासाठी वारंवार वकील यांना विनती करावी लागते, काही वकील जास्त पैसे घेतात म्हणून, सरकारी वकील भारतात खाजगी खटले घेऊ शकतात सरकारी वकील बरे असतात. आणि आपला पैसा आणि वेळेची बचत होत असते.
जिल्हा न्यायालय विनंती अर्ज कसा करावा :
मा. जिल्हा न्यायालय सो.
जिल्हा विधी प्राधिकरण न्यायालय
यांच्या सेवेशी जिल्हा औरंगाबाद.
दिनांक.
अर्जदार ( पूर्ण नाव पत्ता लिहा )
विषय : जनहितार्थ जिल्हा विधी प्राधिकरण मार्फत मोफत वकील मिळण्याबाबत.
महोदय.
मी आपणास उपरोक्त विषयानुसरून विनंती पूर्वक अर्ज करितो कि, जनहित याचिका निर्बंध न्यायालयात दाखल करावयाचा कारणाने शासकीय न्याय प्राधिकरणामार्फत सरकारी वकील केस लढण्यासाठी व बाजू मांडण्यासाठी मिळावे. कारण मी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आदिवासी सुशिक्षित व तरुण असून माझी आर्थिक परिस्थिती खाजगी वकील न लावू शकल्याने जन हितार्थ मला वकील मिळावा.
न्यायालयात केस दाखल करण्याचे प्रधान असे की, मी मौजे ( गावाचे नाव / शहराचे नाव लिहा )येथील कायमचा रहिवासी असून ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कागदोपत्री विकास कामांची चौकशी, व पदाचा दुरुपयोग आणि भ्रष्ट मार्गाने गेलेला पैसा हा चौकशी होऊन संबंधी कडे वसूल करून शासन तिजोरीत जमा व्हावा, या उद्देशाने जनहितार्थ निस्वार्थ पणाने मी शिरपूर पंचायत समिती ते मुंबई सचिव यांच्याकडे वारंवार मौजे ( गावाचे नाव / शहराचे नाव लिहा ) ग्रामपंचायती झालेल्या भ्रष्टाचाराविषयी तक्रारी केल्या.
SC/ST | कोर्टात केस लढण्यासाठी मोफत वकील मिळतो लिंक.
परंतु आज पर्यंत मला वाटेच्या दृष्टिकोनातून माझी तक्रारीची दखल कुठल्याही संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याकारणाने शेवटी न्याय प्राधिकरण कडूनच मला न्याय मिळेल या उद्देशाने मी आज आपल्याकडे न्याय विधी प्राधिकरण मार्फत मोफत वकील मिळण्याची पुनःच विनंती. करीत आहे तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक मला वकील बाजू मांडण्यासाठी मिळावा ही नम्र विनंती.
दिनांक 26/12/2022 रोजी विस्तार अधिकारी यांच्या गुन्हा दाखल करण्याचा शासन निर्णय आणि निलंबीत करण्याचा शासन निर्णय माहिती अधिकारात माहिती मांगितल्याने, औरंगाबाद खंडपिटात याचिका दाखल केले आहे. तसेच लोकप्रतिनिधी यांच्या वर गुन्हा दाखल करण्याचा, भ्रष्टाचार करण्याऱ्या अधिकारी यांना निलंबीत करण्याचा शासन निर्णय, गुन्हा दाखल करण्याचा शासन निर्णय मांगण्यात आले आहे.
जिल्हा न्यायालयात विनंती अर्ज कोठे करावा?
सरकारी वकील तुम्हाला मोफत कायदेशीर सल्ला किंवा केस लढण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करायची गरज नाही तुम्ही विनंती अर्ज हा इंग्लिश, हिंदी, मराठीत अर्ज दिलेल्या Gmail वर सेंड करू शकता. आणि आपला योग्य ते काम होईल. mahdhudc@mhstate.nic.in @shailesh_pawara