एकविरा माता चौक व एकविरा माता नगर नामकरण करा. अखिल भारतीय मानवाधिकार संघाची मागणी.
पिंपळनेर – येथील गावाबाहेर असलेल्या एकविरा माता मंदिर हे प्राचीन मंदिर असून या मंदिरात दररोज तसेच नवरात्रात असंख्य भाविक दर्शनाला येत असतात.तसेच कित्येक ग्रामस्थांचे ते कुलदैवत देखील आहे.
पिंपळनेर येथील गोपाळ नगर पुढील वडरवाडी पासून पुढे एकविरा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकाला *एकविरा माता चौक* व एकविरा माता मंदिराजवळील वस्तीला *एकविरा माता नगर* असे नामकरण करण्यास परवानगी मिळावी व तसा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करण्यात यावा,
कारण हा विषय जनतेच्या श्रद्धेचा व भाविकांच्या आस्तेचा असल्यामुळे लवकरात लवकर ग्रामपंचायत सभेत ठराव करून *एकविरा माता चौक* व *एकविरा माता नगर* नामकरणास परवानगी देण्यात यावी.
अशी मागणी अखिल भारतीय मानवाधिकार संघामार्फत पिंपळनेर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री. अहिरे यांना 261 ग्रामस्थांच्या सह्यांच्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. सदर निवेदन देण्यासाठी अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे अध्यक्ष श्री. प्रविण थोरात व पदाधिकारी श्री. राजेंद्र एखंडे हे उपस्थित होते.
Leave a Reply