Aaple Sarkar Seva (महा ई सेवा) केंद्र मंजुर यादी जाहीर |


Aaple Sarkar Seva Kendra Active List 2023 धुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागासाठी रिक्त असलेले आपले सरकार सेवा (महा ई सेवा) केंद्र मंजुर करणेकामी दि. २७/९/२०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार दि.३१/१०/२०२२  अर्ज करणाऱ्या सर्व अर्जदारांनची यादी प्रसिद्धी झाली आहे.



शहरी भागासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीनुसार मंजुर करावयाचे केंद्रांबाबत निर्णय राखीव ठेवण्यात येत असून ग्रामीण क्षेत्रातील प्राप्त अर्जादारांची शासन निर्णय दि. 19/01/2018 मधील तरतुदीप्रमाणे सीएससीव्दारे केलेल्या व्यवहारांच्या संख्या विचारात घेवून प्राधान्य क्रमांकानुसार आपले सरकार सेवा (महा ई सेवा केंद्र मंजुरीकामी प्रक्रिया करण्यात आली आहे.

त्यात ज्या अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अश्या अर्जदाराना सदर जाहिर सुचनांपासुन पुढील १ महिन्याकरिता कागदपत्र पुर्तता करणेकामी मुभा देण्यात येत आहे.

PDF पाहावायची असल्यास  लिंक  वर क्लिक करा.



प्रस्तुतकामी जाहिरातीत प्राप्त अर्जाची पात्र / अपात्र उमेदवारांची यादी जिल्ह्याचे संकेतस्थळावर (www.dhule.gov.in) प्रसिध्द करण्यात येत आहे.

 यात पात्र उमेदवारांना आपले सरकार सेवा ( महा ई सेवा ) केंद्र मंजुर करण्यात येत असुन याकामी पुढील प्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच कागदपत्र अपुर्ण असलेल्या उमेदवारांनी मुदततील कागदपत्र न सादर केल्यास त्यांना मंजुर करण्यात आलेले महा ई सेवा केंद्र रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !