Borgav |महाराष्ट्र शासन आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न.

Borgav  |महाराष्ट्र शासन आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न.

बोरगाव : शालेय शिक्षण व जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व क्रीडा युवक सेवा संचनालय यांच्या सयुंक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल शालेय क्रीडा स्पर्धा दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती स्टेडियम , नाशिक येथे पार पडल्या. 

यावेळी झालेल्या क्रीडाप्रकारांपैकी व्हॉलीबॉल या प्रकारात इगतपुरी तालुक्यातील पिंप्री येथील आदिवासी विकास विभाग संचलित महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिकचे एकलव्य शाळेतील १९ वर्षातिल मुलांच्या संघानी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने बाजी मारत विभागस्तरासाठी यशस्वी झेप घेतली आहे. 

यामध्ये १९ वर्षेआतील व्हॉलीबॉलमधील एकलव्य शाळेच्या संघाने सिन्नर तालुक्याला २५ – १८ ,२५ – १५ च्या फरकाने हरवले. 

निफाड तालुका या संघास २५ -२० ,२५ -१६ या फरकाने हरवले सेमी फायनलला चांदवड या संघाला २५ -१४ व २५ – १८ अश्या मोठ्या फरकाने धूळ चारत अंतीम सामन्यात धडक मारली अंतिम सामना हा इगतपुरी व कळवण यामध्ये झाला या सामन्यात कळवण संघाला २५ -२१ ,२२ -२५ व १५ – ०७ य फरकाने एकलव्य इगतपुरी या संघाने जिल्ह्यावर विजयचा शिक्कामोर्तब केला व एकलव्यच्या १२ खेळाडूंची निवड शालेय क्रीडा स्पर्धेसाठी विभागस्तरावर झाली.  

विजयी संघ पुढीलप्रमाणे – 

 १९ वर्षेआतील मुले – १)मुकेश बारेला, २)चेतन खाडम, ३)राहुल जगताप, ४)अक्षय भोये, ५)दिपक नावडे, ६)विवेक बारेला,७)भरत घाटाळ, ८)जयसिंग पाडवी, ९)अनिल पावरा, १०)कुंदन अहिरे, ११)वैभव इरणक, १२)अनंता गालट.

सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक एस.डी. महाले सर यांचे तालुका क्रीडा प्रमुख विजय सोनवणे सर, इगतपुरी तालुकातील सर्व क्रीडा शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, तसेच शाळेचे प्राचार्य संतोष दुकले सर, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन करत कौतुक केले व विभागीय शालेय क्रीडास्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !