“निवडणुकीच्या आधी कोकण महामार्ग बनवा, नाही तर तुम्हाला घरी बसवणार..!” आता अशा सत्याग्रहाचीच वेळ आलेली आहे…
येत्या निवडणुकीच्या आधी हा महामार्ग अन्य कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या तोडीचा झाला नाही तर पक्ष कोणताही असो, येत्या निवडणुकीत सर्व आमदार-खासदारांना हरवून घरी बसवायचं, असाच निर्वाणीचा निर्धार कोकणातल्या सर्व मतदारांनी करायला हवा… आणि मतदानाचा बहिष्कार करायचा नाही, खच्चून मतदान करून सगळ्या वर्तमान आमदार-खासदारांना खुर्चीवरून खालीच खेचायचं..!
गेली १०-१२ वर्षे सगळ्यांनी फक्त सबबी सांगितल्या गेल्या, पण मुंबै-गोवा संपूर्ण कोकण महामार्ग नेहमी खेडेगावच्या बैलगाडीच्या रस्त्यांपेक्षाही वाईट अवस्थेत असतो…! कैक पटीनं मोठा समृद्धि महामार्ग फक्त दोन-अडीच वर्षात सर्वस्वी नव्याने बनवल्याला टेंभा मिरवला जातो… तिथे जमिनींच्या अधिग्रहणात इंचभराचाही अडथळा आला नाही, पण कोकण महामार्गाच्या रुंदीकरणासाठी फर्लांगा-फर्लांगाच्या काही तुकड्याचं अधिग्रहण होऊ न शकल्याच्या टुकार सबबी सांगितल्या जात आहेत… अनेक सरकारं बदलली, कैक आमदार-खासदार आले-गेले… या सर्वांनी इतक्या वर्षात काय केलं, याचा जाब विचारायलाच हवा..!
यांना फक्त सत्तेच्या सारीपाटावर सोंगट्या हलवता येतात, पण कोकणाच्या गरजेचं हे एक काम मात्र टाळलंच जातंय… आता बस्स..!!