शिरपुर पंचायत समिती, चा कृषि विस्तार अधिकारी, लाच स्विकारतांना रंगेहात पकडला गेला.

योगेशकुमार शांताराम पाटील, कृषि विस्तार अधिकारी, पंचायत समिती, शिरपुर यांनी तक्रारदार यांचेकडुन ५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडले..Shirpur Panchayat Samiti Krushi Adhikari

तक्रारदार हे मौजे बुडकी विहीर, ता. शिरपुर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांच्या आईच्या नांवे सांगवी वनक्षेत्रात वन जमीन असुन तक्रारदार यांनी आईच्या नांवे सदर वन जमीनीवर सिंचन विहीर खोदण्यासाठी सन २०२३-२०२४ मध्ये बिरसा मुंडा कृषि कांती योजने अंतर्गत ४,००,०००/- रु शासकीय भुनदान मंजुर होण्याकरीता आवश्यक कागदपत्रांसह दि.२०.०४.२०२२ रोजी ऑनलाईन अर्ज करुन त्यानुसार त्यांना सदर योजनेअंतर्गत विहीर खोदण्याकरीता ४,००,०००/- रु शासकीय सुनदान मंजुर झाले आहे.

शिरपूर पंचायत समिती, चा कृषी विस्तार अधिकारी acb चा जाळेत Shirpur Panchayat Samiti Krushi Adhikari

योगेश पाटील, कृषि विस्तार अधिकारी, पंचायत समिती, शिरपुर यांनी तक्रारदार यांच्या आईच्या नांवे मंजुर झालेल्या सिंचन विहीरीच्या जागेची स्थळ पाहणी करुन तक्रारदार व त्यांच्या आईचा फोटो काढुन नेला होता. त्यावेळी कृषि विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तक्रारदार यांना विहीरीचे लाईन आउट करतेवेळी ५,०००/-त्यांना द्यावे लागतील असे सांगितल्याने तक्रारदार यांनी दि.०७.०२.२०२५ रोजी ला. प्र. विभाग, धुळे कार्यालयात येवुन लेखी तक्रार दिली होती

सदर तक्रारीची पंचांसमक्ष आज दि.०९.०२.२०२५ रोजी पडताळणी केली असता कृषि विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे ५,०००/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम मौजे बोराडी, ता. शिरपुर येथील स्टेट बँके समोर स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द शिरपुर तालुका पो.स्टे. येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शना खाली लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: हे तुम्ही copy करू शकत नाही !