लग्न घरात तोरण बांधण्यासाठी आंब्याची पाने घेण्यासाठी गेलेल्या भावाचा मृत्यू सोनगीर येथील घटना : अपघातात दुसरा मामेभाऊ जखमी
Ambe Toran | आंब्याची पाने घेण्यासाठी गेलेल्या भावाचा मृत्यू. |
सोनगीर : मामाच्या घरी मामे बहिनीच्या लग्नाची लगबग सुरू असताना घराला आंब्याच्या पानांच्या कपिल कासार तोरणाने सजविण्यासाठी पाने घ्यायला जात असताना जामफळ धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उतारावर दुचाकी घसरल्याने दोघांचा अपघात झाला यात मामेभाऊ कपिल कासार (३९) यांचा मृत्य झाला.
कपिल हे उत्कृष्ट कारागीर होते.
मयत कपिल हे तांबे, पितळ भांडी बनविणारे एक उत्कृष्ट कारागीर होते. कपिल यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक बहीण, एक भाऊ तसेच एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
रुग्णालयात उपचार सुरु असल्याची घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. सोनगीर गावात मंगळवारी मामे बहिणीचे लग्न असल्याने गावातील कपिल शामसुंदर कासार (वय ३९) व सोहन गोपाळ कासार (वय २४) दोघे मामेभाऊ रा. सोनगीर हे दोघे शनिवारी दुपारी एमएच १८ सीसी ५७०२ क्रमांकाच्या दुचाकीने घराला तसेच मांडवाला आंब्याच्या लावण्यासाठी आंब्याचे पानेपानांचे तोरण घेण्यासाठी जामफळ धरण परिसरात असलेल्या एका शेतात जात होते.
Related News : पोलीस कस्टडीत मृत्यू
त्यावेळेस रस्त्याच्या उतारावर मोटारसायकल घसरली. अपघातात कपिल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ प्रतीक देशमुख यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले, तर सोहन कासार यांना उपचारासाठी तातडीने धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सोनगीरचे भांडे व्यापारी मन्नालाल कासार, उदय कासार, गोपाळ कासार यांचे भाचे होते. सोनगीर पोलीस ठाण्यात चुलत भाऊ मिलिंद चंद्रशेखर कासार यांनी खबर दिली, सोनगीर पोलिसात नोंद झाली.
Leave a Reply