कार्यालयाचे नाव ‘रोजगार हमी’, पण उघडण्याची नाही हमी!
ग्रामीण बातम्या मुक्ताईनगर : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात असलेल्या रोजगार हमी योजनेचे कार्यालय हे कायमच बंद राहत असल्याने रोजगार सेवक तसेच मजूर आणि इतर कामे असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ‘कार्यालयाचे नाव रोजगार हमी, ना उघडणार ना कधी उघडण्याची हमी!’ असं म्हणण्याची वेळ आलेली आहे.
तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत घरकुल वृक्ष लागवड यासारखी नवीन कामे, तर विहिरी, बंधारे खोलीकरण यासारखी जुनी कामे आहे. तालुकाभर सुरू आहे. मस्टरमध्ये माहिती भरणे, मस्टर टाकणे किंवा काढणे यांसारख्या विविध कामांच्या निमित्ताने मुक्ताईनगर येथे बहुतांशी वेळेस लाभार्थी है पंचायत समिती आवारातील रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात येत असतात. परंतु गेल्या वर्षभरापासून हे कार्यालय कधीही उघडे दिसत नाही.
ऑनलाईन तक्रारी कशी करावी सविस्तर वाचा, क्लिक करा.
या कार्यालयात कार्यरत असणारे कर्मचारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कधीही फोन रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात केवळ तीन कर्मचारी कार्यरत असून, दोन कर्मचाऱ्यांकडे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहण्याची नेमणूक आहे तर ऑपरेटरने कार्यालयात थांबणे आणि लाभार्थीचे फोन उचलणेसंदर्भात त्यांना सूचना देण्यात येतील.
• हेमंत कुमार काथेपुरी, प्रभारी गटविकास अधिकारी
उचलला जात नाही. त्यामुळे लाभार्थीनी व नवीन काम आणणाऱ्या रोजगार तसेच रोजगार सेवकांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
CSC चालकाची अशीही पद भरती झाली. वाचून चक्क व्हाल. क्लिक करा
तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत गुरांच्या गोठ्याची प्रकरणे प्रलंबित असून कामेदेखील तत्काळ चालू करण्याची मागणी ग्रामस्थ व लाभार्थी करत आहेत.
उन्हाळ्यापूर्वी गोठे मंजूर झाले असते तर गुरांना सावली आणि पावसाळ्यात पावसापासून संरक्षण करता आले असते. परंतु विलंब का होईना अजूनही गोठ्यांची कामे तत्काळ सुरू करण्याची मागणी लाभार्थी करत आहेत.
हेही वाचा :
Leave a Reply