वेळेत लाइट आली नाही, तर ग्राहकांना माहितीच नसल्याने भरपाई कुणी मागेना.

वेळेत लाइट आली नाही, तर महावितरणकडून घ्या पाचशे रुपये आयोगाची तरतूद :  माहितीच नसल्याने भरपाई कुणी मागेना.

ग्रामीण बातम्या नाशिक प्रतिनिधी : कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयांना नियमांच्या चौकटीत राहून कामकाज करावे लागते. त्यानुसार महावितरण कंपनीला देखील ग्राहकांना सेवा देण्यासाठी नियमांचे पालन करावे लागते. परंतु ग्राहकांना याबाबतची पुरेशी माहिती नसल्याने याबाबतचा दावा केला जात नाही. वास्तविक ग्राहकांना निर्धारित वेळेत वीज सेवा मिळाली नाही तर ग्राहक महावितरणकडून भरपाई मागू शकतात.

वेळेत विजेची सेवा दिली पाहिजे.

ग्राहकांना निर्धारित वेळेत विजेची सेवा दिली पाहिजे असे बंधनकारक आहे. जर निर्धारित वेळेत सुविधा दिली गेली नाही तर महावितरणकडून ग्राहकाला भरपाई मिळू शकते. लघु आणि उच्चदाब ग्राहकांना प्रति तास प्रमाणे भरपाई मागण्याचा अधिकार आहे. वेळेत वीज आली नाही, फ्यूज दुरुस्ती, जळालेले मीटर, भूमिगत लाईन याबाबत शहरी आणि ग्रामीण भागासाठी भरपाईची तरतूद आहे.

अनभिज्ञ की सावधानता

वीज नियामक आयोगानेच जर अशाप्रकारच्या भरपाईची तरतूद केलेली असेल आणि तरीही महावितरणकडून अशा प्रकारची भरपाई दिलेली नसेल तर ही बाब दडवून ठेवण्यात आली असावी असा संशय घेतला जात आहे.

  • फ्यूज दुरुस्ती शहर : फ्यूज दुरुस्ती संदर्भात तक्रार आल्यानंतर ही तक्रार शहरी विभागाची असेल तर पुढील तीन तासात दुरुस्ती करावी असे बंधनकारक आहे.
  • भूमिगत लाईन दुरुस्ती शहर भूमिगत लाईनमध्ये बिघाड झाल्याची तक्रार सोडविण्यासाठी ८ तासांची वेळ ठरविण्यात आली आहे. शहरासाठी याप्रकारची वेळ आहे.
अशाप्रकारची काही तरतूद आहे याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. महावितरणकडून याबाबतची माहिती देखील देण्यात आलेली नाही. अनेक ग्राहक महावितरण कार्यालयात चकरा मारतात. आजवर ग्राहकांना अंधारात ठेवले असेच म्हणावे लागेल.
कोणत्या कामासाठी किती वेळ?
  • फ्यूज दुरुस्ती ग्रामीण
  • फ्यूज दुरुस्ती संदर्भातील तक्रार जर ग्रामीण भागातील असेल.
  •  या भागातील तक्रार पुढील २४ तासात सोडविणे अपेक्षित आहे.
  • भूमिगत लाइन दुरुस्ती ग्रामीण
  • भूमिंग लाईन संदर्भातील ग्रामीण भागातून तक्रार आली तर
  • अशाप्रकारची तक्रार २४ तासात पूर्ण करून द्यावी लागणार आहे.
  • जळालेले मीटर बदलण्यासाठी शहर
  • वीज मीटर जळाल्याची तक्रार शहरातील असेल तर १८ तासांमध्ये निकाली काढणे बंधनकारक आहे.
  • जळालेले वीज मीटर बदलण्यासाठी.
  • ग्रामीण भागातील वीज मीटरच्या तक्रारी निकाली काढण्याची ४८ तासांत डेडलाईन देण्यात आली आहे.

तर ग्राहकांना ५० किंवा १०० रुपयांची भरपाई

विलंबाने सेवा दिली तर राज्य विद्युत वीज नियामक आयोगाने महावितरणकडून भरपाई देण्याची तरतूद केली आहे. लघुदाब ग्राहकांना प्रति तास ५० रुपये किया जास्तीत जास्त ५०० रुपये आणि उच्चदाब ग्राहकांना प्रति तास १०० रूपये आणि जास्तीत जास्त १ हजार रुपयांची भरपाईची तरतूद केली आहे.

ग्राहकांना ठाऊक आहे का?

अशी माहिती आज कळते आहे. महावितरणची सेवा कधीच वेळेत मिळत नाही. भरपाई देण्याला सुरुवात केली तर त्यांना आर्थिक फटका बसेल हे त्यांना माहीत असल्याने कदाचित ते ग्राहकांना याबाबत माहिती देत नसावेत. आता आम्ही भरपाईसाठी उभेच राहू. रावसाहेब अंबुरे, ग्राहक

एकालाही भरपाई नाही

निर्धारित वेळेत सेवा मिळाली नाही तर ग्राहक महावितरणकडून मागू शकते. मात्र ग्राहकच याबाबत अनभिज्ञ असल्याने याबाबतचा दावा करण्यात आलेले नाही. त्यामुळे नाशिक परिमंडळात भरपाईची एकही केस नसल्याचे दिसते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !