तिसगांव च्या सभेत अजित दादांनी घेतला सत्ताधाऱ्यानचा समाचार.
तिसगाव आणि इतर ३९ गावांकरिता तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कार्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली. सुमारे १५४ कोटी रुपयांच्या या योजनेचा भूमिपूजन सोहळा आज तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते माननीय श्री. अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755.
तिसगाव हे बाजारपेठेचा मोठे गाव आहे. भविष्यात लोकसंख्याच्या दृष्टीने या गावाचा विस्तार होणार आहे. त्यामुळे या गावासाठी स्वतंत्र जल योजना असावी यासाठी अधिकारी वर्गासह मी स्वतः तांत्रिक बाबींवर अभ्यास केला. सर्व गावकऱ्यांनी सरपंचांनी या कार्यासाठी हातभार लावला आणि आज आपण योजना अस्तित्वात आणण्याच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे टाकले. सध्या अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना ही कालबाह्य होत असल्याने पाईप फुटण्याच्या घटना घडत असतात.
योजनेच्या अंतिम टप्प्यात हे गाव असल्याने या दुष्काळी भागात दररोज पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची रास्त मागणी ग्रामस्थांनी विशेषता महिला भगिनींनी माझ्याकडे केली. नवीन योजनेत या गावांचा समावेश व्हावा यासाठी स्वतः बारकाईने लक्ष घालून आराखड्यात बदल केले. या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू झालेला आहे. काल आचारसंहिता असताना देखील या योजनेचे भूमिपूजन उरकून घेतल्याचे मला कळले. गेल्या दहा वर्षात तुम्ही जेवढे पाणी पाथर्डी करता दिले त्याच्या तिप्पट पाणी मी तीन वर्षात येथे आणले. तरी या गोष्टीचे मला श्रेय घ्यायचे नाही. कारण लोकांच्या चेहऱ्यावरील समाधानात माझा खरा आनंद आहे.
या योजनेचे काम उत्तम दर्जाचे आणि गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी आपण सर्वजण लक्ष ठेवूयात.
तिसगाव ता. ५ पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूरचा बालेकिल्ला उध्वस्त झाल्याने व जनतेचा कौल लक्षात आल्याने या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणखी पुढे ढकलत रडीचा डाव खेळला असून महिलांचा सन्मान करा अशी भाषा वापरणाऱ्या राज्यकर्त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी दिली नसून या सरकारचा पुण्याच्या पोटनिवडणुकीत बंदोबस्त करा अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केली.
तालुक्यातील तिसगाव सह तेहतीस गावांच्या पाणीयोजनेला मंजुरी दिल्याबद्दल पवार व आमदार प्राजक्त तनपुरे यांचा लाभार्थी गावातील प्रतिनिधींच्या हस्ते तिसगाव येथे सत्कार करण्यात आला या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आमदार प्राजक्त तनपुरे,आमदार निलेश लंके,चंद्रशेखर घुले,प्रताप ढाकणे,डॉ. उषाताई तनपुरे,राजेंद्र फाळके,राजेंद्र दळवी,क्षितिज घुले,शिवशंकर राजळे,चंद्रकांत म्हस्के,काशिनाथ पाटील लवांडे,भगवान दराडे,इलियास शेख,मुनीफा शेख,संगीता गारुडकर,नासिर शेख,बंडू बोरुडे,सीताराम बोरुडे,चांद मणियार हे उपस्थित होते. या वेळी बोलताना पवार म्हणाले कि सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगा समोर खटला चालू असतानाही सत्तेवर आलेले हे सरकार घटनाबाह्य आहे. सध्याचे राज्यकर्ते व त्यांचे बगलबच्चे बेताल वक्तव्ये करत महापुरुषांचा अवमान करत आहे.
हे सरकार सत्तेवर येऊन अनेक महिने झाले असले तरीही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. अनेकांना मंत्रिपदाचे गाजर दाखवल्याने काही आमदारांनी सूट शिवून घेतले आहे तर काहींनी देवाला मंत्रिपद मिळावे म्हणून नवस केले आहेत.सध्या त्रेचाळीस जण मंत्री पाहिजे होते मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची यांनी भीती वाटत आहे. राज्याची अशी अवस्था आपण या पूर्वी कधी पहिली नव्हती.सरकार येतात व जातात कोणीच सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
शिवसेना प्रमुखांनीच आपले वारसदार म्हणून उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची नावे जाहीर केली होती मात्र शिवसेना सोडून ही मंडळी गुवाहाटीला पळून गेली. जे शिवसेना सोडून गेले ते परत निवडून आले नाही हा इतिहास आहे. हिम्मत असेल तर ह्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे. करोना काळात लोकांचे जीव वाचवण्याचे मोठे काम आम्ही केले. आजपर्यंत अनेक पंतप्रधानांचा कारभार देशाने पहिला मात्र राज्याराज्यात तोडफोड करून सत्ता मिळवणारे मोदी हे पाहिले पंतप्रधान आहेत. तिसगाव सह तेहतीस गावांच्या पाणीयोजनेसाठी प्राजक्त तनपुरे यांनी आपल्याकडे अनेकवेळा पाठपुरावा केल्याने या योजनेला मंजुरी देता आली.
योजना मंजूर झाली असली तरीही योजना सुरु झाल्या नंतर पाणीपट्टी भरत चला असे आव्हान त्यांनी केले तर या वेळी प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजी कर्डीले यांचा नामोल्लेख टाळून टीका केली. या वेळी बोलताना ते म्हणाले कि कालच्या कार्यक्रमात काहींनी माझ्यावर टीका करत मिरी कुठे आहे हे ह्यांना माहित नाही म्हणाले पण त्यांनी फक्त आता बुर्रहानगर मध्ये लक्ष घालावे. आज कार्यक्रम ठरल्याने काल आचारसहिंता असतानाही घाईघाईत कार्यक्रम घेतला.मी काय काम केले याचा ते हिशोब मागतात मात्र मी हिशोब दिला तर तुम्हाला तो वाचता सुद्धा येणार नाही. या योजनेला अजित पवार यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याने या योजनेचे श्रेय हे पवार यांचे असल्याचे ते म्हणाले प्रास्ताविक शिवशंकर राजळे सूत्रसंचालन उद्धव काळापहाड तर आभार अमोल वाघ यांनी मानले. फोटो ओळी तिसगाव तिसगाव प्रादेशिक योजनेच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*
Leave a Reply