News in Marathi : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर.! Breaking News

News in Marathi : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर.! Breaking News
News in Marathi : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर.! Breaking News 


जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान शेवगाव तालुक्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ऐन दिवाळीतही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर.!

अविनाश देशमुख शेवगाव.

अतिवृष्टीमुळे नुकसान झलेल्या पिकांची महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली पाहणी……! महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या खरीप पिकांची पाहणी करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बोधेगाव, बालमटाकळी, लाडजळगाव येथील खरीप पिकाबरोबर कापूस पिकाची बांधावर जाऊन पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली* असुन अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातील पिकांचे १०० टक्के सर्वाधिक नुकसान झाले आहे.

मात्र शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन न केल्यामुळे महसूलमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावर मात्र चांगलेच ताशेरे ओढुन सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असून पंचनामे हे सरसकट करून नुकसान भरपाई देऊन भरीव मदत करणार असल्याचे महसूलमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

 तसेच जे शेतकरी ई पीक पाहणी पासून वंचित राहिलेले आहेत त्यांना देखील सरसकट मदत देऊन *ई पीक पाहणीचे अट शिथिल करून पीक विम्या संदर्भात लवकरच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक बोलवण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत करण्याची भूमिका ही राज्य सरकारची राहील, अशा संकटकाळात शेतकऱ्यांमागे हे सरकार खंबीरपणे उभा आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही तो शेतकरी देखील पंचनाम्यापासून तसेच मदतीपासून वंचित राहणार नाही.

असेही महसूलमंत्री विखे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार छगनराव वाघ, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, उपसरपंच तुषार वैद्य, माजी जिल्हा परिषद सदस्य नितिन काकडे, शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, चंद्रकांत गरड, मोहनराव देशमुख यांच्यासह महसूल विभाग, पोलीस विभाग कृषी विभाग, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आदी सर्वच विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

ताजा कलम.

परतिच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेले आतोनात नुकसान पीक पाहणीचा फारसं ण करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत तालुक्यातील सर्व राज्य महामार्गांची झालेली दुरावस्था काल बोधेगाव मधील व परिसरातील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने रातोरात बुजविले.

 सध्याचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार जिल्ह्याचे खासदार यांचे शेवगांव तालुक्याकडे झालेले दुर्लक्ष यावर त्यांचे लक्ष वेधण्यासाठी मंत्री महोदयांनी शेवगाव तालुक्यात वारंवार दौरा केला पाहिजे म्हणजे एक एक करून सर्व रस्ते खड्डे मुक्त होतील अशी चर्चा तालुक्यामध्ये सुरु आहे* 

*अविनाश देशमुख शेवगाव* 

*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !