राज्य शासनाने केली गरीबांची दिवाळी आनंदी राज्य शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ या कार्यक्रमाचा वाघाडीत शुभारंभ धुमधडाक्यात.
राज्य शासनाने केली गरीबांची दिवाळी. ‘आनंदाचा शिधा’ – Shirpur Taluka Anandacha Sidha |
शिरपूर : राज्य शासनाने केली गरीबांची दिवाळी आनंदी राज्य शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ या कार्यक्रमाचा वाघाडीत शुभारंभ धुमधडाक्यात करण्यात आला. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, धुळे जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांचा हस्ते वाघाडी येथे रेशन दुकान क्र. ५१ मधील रेशन धारकांना किट देवुन शुभारंभ करण्यात आला.
या वेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, वाघाडी पोलिस पाटील अमोल पवार, जगन्नाथ पाटील आदि उपस्थित होते. याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीचे सरकार आल्यापासून लोक कल्याणाच्या योजनांचा सपाटा सुरू झाला आहे.
त्यातीलच एक योजना आहे आनंदाचा शिधा. ज्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातुन जे लोक धान्य घेतात त्यांना दिवाळीनिमीत्त एक शिधा जिन्नस किट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ज्यामध्ये 1 किलो साखर, 1 किलो रवा, 1 किलो चणादाळ, 1 लीटर पाम तेल याचा समावेश आहे.
ही किट फक्त 100 रूपयांमध्ये उपलब्ध झाली आहे. ज्याचा फायदा जिल्हयातील 4 लाख 9 हजार 275 शिधापत्रीका धारकांना होणार असल्याचे सांगितले. सोमवार दि. २४ आॅक्टोंबर रोजी संध्याकाळी या स्वस्त धान्य दुकानातुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला व बबनराव चौधरी, देवेंद्र पाटील यांचा हस्ते लाभार्थींना या किटचे वितरण केले. यावेळी मोठ्या संख्खेने महिला, पुरुष व लाभार्थी उपस्थित होते.
Leave a Reply