State-Maharashtra RTI | राज्य माहिती आयुक्ताचा आदेश..

शिक्षणधिकारी ( माध्यमिक) जिल्हा परिषद धुळे यांच्यावर प्रशासकिय कारवाही करा.

राज्य माहिती आयुक्ताचा आदेश.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री.अंबादास सुकदेव पवार माहिती यांनी माहितीचा अधिकाराअंतर्गत जन माहिती अधिकारी तथा उपशिक्षणधिकारी माध्यमिक जि.प धुळे यांच्याकडे दिनांक14-2-2020  रोजी अर्ज करुन केन्द् पुरस्कुत अंपग एकात्मिक शिक्षण योजना व अंपग समावेशित शिक्षण योजनेमधील भ्रष्ट्र कारभाराबाबत चौकशी करुन दोषी विरुध्द फौजदारी कार्यवाही करण्याबाबत  शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी दिलेल्या आदेशान्वये कार्यालयाने सादर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आर.टी. आय लोगोसह मिळण्याबाबत माहिती मिळण्याची विंनती केली होती.

राज्य माहिती आयुक्ताचा आदेश.
राज्य माहिती आयुक्ताचा आदेश.


त्यावर जनमाहिती अधिकारी तथा उपशिक्षणधिकारी माध्यमिक यांनी विहीत मुदतीत माहिती दिली नाही.व कोणताही प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे दिनांक 14-3-2020 रोजी प्रथम अपिल दाखल केले माञ शिक्षणधिकारी माध्यमिक जि.प धुळे यांनी अपिल निकाली काढलेच नाही.त्यामुळे पवार यांनी दितीय अपिल दाखल केले.

राज्य माहिती आयोग नाशिक खंडपिठ यांच्याकडे सुनावणीच्या दरम्यान प्रथम अपिलीय अधिकारी तथा शिक्षणधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे हे सुनावणीला गैरहजर होते.

 त्यामुळे आयोगाने या प्रकरणी गंभीर दखल घेवुन सामान्य प्रशासन विभागाचे परिपञक प्र.क्र.  (222/15) सहा. दिनांक 1-12-2015 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. धुळे यांनी कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तिस दिवसाच्या आत  आयोगास सादर करावा असे आदेशात नमुद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !