Aaplesarkar mahaonline gov in : महा ई-सेवा केंद्रांची अचानक तपासणी दोन केंद्रे सील : बनावट प्रमाणपत्र तयार केले.
लातूर : लातूर तालुक्यासह जिल्ह्यात महा ई-सेवा केंद्रे सुरू आहेत. मात्र, या केंद्रांतून प्रमाणपत्र देण्यासाठी नागरिकांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने अचानक लातूर शहर व तालुक्यातील महा ई-सेवा केंद्रांची शुक्रवारी अचानक तपासणी करण्यात आली. या तपासणीत दोन केंद्रांमध्ये बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचे दिसून आले असून, ते केंद्र सील करण्यात आले आहेत. दहावी व बारावीचा निकाल नुकताच लागला असून, शैक्षणिक कामकाजासाठी रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उन्नत प्रगत गटात न मोडणारे प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र आदी विविध प्रमाणपत्रांसाठी महा-ई सेवा केंद्र आपले सरकार केंद्रातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातात. मात्र, या
तलाठ्याची स्वाक्षरी स्कॅन करून ठेवली : Aaplesarkar mahaonline gov in
• केंद्रातील संगणकाची तपासणी केली असता तलाठ्याची स्वाक्षरी स्कॅन करून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.
• स्कॅन केलेल्या स्वाक्षरीचा वापर करून बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचे निदर्शनास आल्याने दोघांच्या नावे परवाना असलेले सेवा केंद्र सील करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला.
केंद्रांतून नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या, त्याअनुषंगाने उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशानुसार लातूर तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या महा ई-सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली. त्यात अनेक त्रुटी व दोष आढळले आहेत.
काय आढळले दोष? : Aaplesarkar mahaonline gov in
केंद्रावर परवाना न ठेवणे, प्रमाणपत्रांसाठी दरपत्रक न लावणे, प्राप्त अर्जाची नोंदवही न ठेवणे, तयार झालेले प्रमाणपत्र वितरित न करणे, शासनाने पुरवठा दिलेल्या दरपत्रकापेक्षा जास्तीची रक्कम आकारून नागरिकांची लुबाडणूक करणे अधिसूचित महा ई-सेवा केंद्र, परवानाधारक स्वतः न चालविता इतर खाजगी ऑपरेटर चालवितात.
अर्जदाराचा फोटो ऑनलाइन न घेता मोबाईलमध्ये ऑफलाइन घेऊन अपलोड करणे, ऑनलाइन पद्धतीने करावयाचे अर्ज, शपथपत्र ऑफलाइन टाइप करून परत कॉपी पेस्ट केल्याचे दिसून आले. आदी दोष आढळले आहेत.
हे देखील वाचा :
- CSC महाऑनलाइन नोंदणी 2024. | Best Information CSC Mahaonline Registration 2024 In Marathi
- जन्म प्रमाणपत्र आयडी दोन मिनिटांत मिळेल. | How to Get Application Form for Birth Certificate ID.
- Aaple Sarkar Seva (महा ई सेवा) केंद्र मंजुर यादी जाहीर |
Important Links :
Related Notification Information Pdf : Aaplesarkar mahaonline gov in | Click Here |
Official Website Information Link : Aaplesarkar mahaonline gov in | Click Here |
Join Us On Facebook | Click Here |
Join Us On Telegram | Click Here |
Join Us On WhatsApp | Click Here |
Join Us On Instagram | Click Here |
Leave a Reply