आदिवासी समाजाच्या विविध मागण्या संदर्भाबाबत तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन.

आदिवासी समाजाच्या विविध मागण्या... Agitation regarding various demands of tribal community

शिरपूर / प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील आदिवासी – समाज आणि विविध सामाजिक संघटना यांनी – येथील तहसील कार्यालया समोर विविध प्रश्नांची

सोडवणूक व्हावी यासाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. शासन मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा देण्यात आला आहे.

आदिवासी समाजाच्या विविध मागण्या… Agitation regarding various demands of tribal community

१७ संर्वगातील रखडलेली पेसा भरती ताल्काळ भरती करण्यात यावी, धनगर समाज बांधवांना अनुसुचित जमाती एस.टी प्रवर्गात आरक्षण न देता त्यांना स्वंतत्र आरक्षण द्यावे, एस.आर.बी. इंटरनेशनल शाळेत इ. ९ वीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला अमानुषपणे बेदम मारहाण करणारे वार्डन मनोज देवरे व शाळा प्रशासनावर एट्रॉसिटी व इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद होवून तात्काळ अटक करून शाळेचे मान्यता रद्द करण्यात यावी,

शिरपूर तालुक्यातील सांगवी गावातील दंगलीत खोटे गुन्हे झालेल्यासह संशयीत युवकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, जिल्ह्यातील शासकिय आदिवासी मुला- मुलींचे वसतीगृहातील सर्व पात्र विद्यार्थाना तात्काळ प्रवेश देण्यात यावी, नामांकित इंग्रजी शाळेचे सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावे, तालुक्यातील वनजमिनी दावे सर्व अपात्र झालेल्या आदिवासी बांधवांचे वनजमिनी दावे सर्व पात्र करून सातबार देण्यात यावे, तालुक्यातील स्वस्त राशन दुकानदार वेळेवर रेशन धान्य देत त्यांनी शासनाच्या जीआरनुसार बांधव सहभागी झाले आहेत.

प्रत्येक गावात रेशन धान्य वाटप सह नविनसह विभक्त करण्यात यावे, पंडित दीन दयाळ संयम योजनेचे रक्कम मध्ये वाढ करण्यात यावी, तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी १९५० पुरावा मागितला जातो जातीचा दाखलाच्या आधारावर दाखले देण्यात यावे,

तालुक्यातील आदिवासी क्रांतीकारक यांचे स्मारक उभारण्यासाठी एखाद्यी जागा उपलब्ध करण्यात यावी, तालुक्यातील आदिवासी समाज बांधवानाठी जागेसह सभागृह बांधण्यात यावे या प्रमुख मागण्या आदिवासींनी केल्या आहेत. तहसील कार्यालया समोर सुरू झालेल्या धरणे आंदोलनात तालुक्यातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित.

आदिवासी समाजाच्या विविध मागण्या... Agitation regarding various demands of tribal community

आदिवासी समाजाच्या विविध मागण्या… Agitation regarding various demands of tribal community

खालील बातम्या देखील वाचा :

  1. सांगवी येथील दंगलीची सीबीआय द्वारे चौकशी करा. बिरसा फायटर्स यांचे निवेदन.

  2. क्रांतिवीर खाज्या नाईक स्मृतिस्थळी जाण्यासाठी ना रस्ता नाही स्मारक

  3. अनुसूचित जाती- जमातींच्या कायदा वाचा मराठीत | SC ST Atrocity Act In Marathi

  4. Agitation regarding various demands of tribal community

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: हे तुम्ही copy करू शकत नाही !