9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिनी धडगांवात विविध कार्यक्रम होणार ;बैठकीत सर्वानुमते निर्णय ॥ August 9 World Tribal Day
आपकी जय, जय आदिवासी, जोहार ! August 9 World Tribal Day
९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यासंदर्भात नियोजनाची बैठक धडगांव येथिल ज.प. कला महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाली. रोहिदास पावरा ( आप्पा ) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी धडगांव येथे विविध कार्यक्रम घेण्याचे एकमताने ठरविण्यात आले.
विश्व आदिवासी दिना निमित्त धडगांव येथे भव्य दिव्य अशी पारंपारीक सांस्कृतिक महारॅली काढण्यात येणार असून भव्य रक्तदान शिबीर, वृक्षारोपणाचा कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.तत्पुर्वी पुर्वसंध्येला मोटारसायकल रॅलीचे आयोजनही करण्यात येणार आहे. ( मोटार सायकलरॅलीचा विषय तुर्तास राखीव ठेवण्यात आला आहे. )
सांस्कृतिक महारॅलीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडणार असल्यामुळे पारंपारीक वाजंत्रीचाच वापर करण्यात यावा असा निर्णय बैठकीत झाला.महारॅलीत आदिवासी एकतेचे दर्शन घडवायचे असल्याने तसेच सारे आदिवासी एक आहेत असा संदेश देण्यासाठी धडगांवात केवळ एकच महारॅलीचे आयोजन झाले पाहिजे. रॅलीत आदिवासी पारंपारीक वेशभुषेत सहभागी झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
सांस्कृतिक महारॅली नंतर प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला. प्रबोधानाचे विषय व वक्ते पुढील बैठकीत निश्चित करण्यात येईल असे सर्वानुमते ठरले.
ऑगस्ट विश्व आदिवासी दिना निमित्त होणाऱ्या एकूण कार्यक्रमासाठी एकूण येणारा खर्च हा नेहमीप्रमाणे लोकवर्गणीतून गोळा करण्यात येणार असुन त्यात पारदर्शकता राहावी यासाठी उदयापर्यत शून्य शिल्लक ( झिरो बॅलेन्स ) असलेले बँक खाते किंवा पोष्टाचे खाते प्रसारीत करण्यात येणार आहे. त्या खात्यावर फोन पे,यु.पी.आय व क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आहे. आणि सढळ हाताने मदत करणाऱ्या सर्व क्षेत्रातील सन्माननिय मान्यवरांना आर्थिक सहयोगासाठी आवाहन करण्यात येणार आहे.
बैठक लोकशाही पद्धतीने प्रत्येकाचे मत समजून घेत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीला मोठया संख्येने कार्यकर्त उपस्थित होते.
नियोजनाची पुढील बैठक दि.२३ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ : ०० वाजता कला महाविद्यालय येथेच घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी पुढील बैठकीला मोठया सर्व क्षेत्रातील आदिवासी बांधवाने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. आभार भरत पावरा यांनी मानले.
- 9 ऑगस्ट आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्या संदर्भात निवेदन.
- विश्व मूलनिवासी दिवस. समझिए पूरा इतिहास पढे | 9 august World Indigenous Day
बैठक यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व ज्ञात -अज्ञांचे मनपुर्वक आभार ! August 9 World Tribal Day