मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आदिवासी समाजाचा शिरपूर येथे जनआक्रोश महामोर्चा तर सांगवी येथे रास्ता रोको.
मणिपूर राज्यात मागील दोन महिन्यांपासून विशिष्ट विखारी विचारधारेमुळे जमात घुसखोरीच्या मुद्द्यांवरून आदिवासी व बोगस आदिवासी ह्यांत संघर्ष सुरू आहे. ह्यावर तोडगा काढण्यात व संघर्ष कमी करण्यात तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार ह्यांना सफशेल अपयश आले आहे. विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री शब्द बोलायला तयार नाही.
आदिवासींच्या ह्या संघर्षात अनेक घटना समोर येत आहेत त्यात समस्त मानवजातीला काळीमा फासणारी मणिपूर येथील घटना आपल्या आदिवासी दोन महिलांना भर रस्त्यावर नग्न दिंड काढणाऱ्या निच औलाद्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देणेच्या मागणीसाठी शिरपूर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या वतीने सांगवी येथे रास्ता रोको व तद्नंतर शिरपूर शहरात आक्रोश महामोर्चा काढण्यात आला..!
शेवटी प्रांत कार्यालयसमोर काही वक्त्यांनी जबरदस्त क्रांतिकारी विचार मांडले. आणि प्रस्थापित सरकार दलीत – आदिवासींसाठी घातक असल्याचा आरोप करत आरक्षणविषयक धोरण, बेरोजगारी, समान नागरी कायद्यावर जोरदार घाणाघात केला.
आजचा रास्तारोको आणि महामोर्चा आदिवासी नेत्यांविना ऐतिहासिक असा झाला.
ह्या रास्ता रोको व आक्रोश मोर्च्यात शिरपूर तालुक्यातील युवा युवती, महिला व शिरपूर तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply