Chief Executive Officer Zilla Parishad Dhule.. |
ता.शिरपूर प्रतिनिधी : उप अभियंता जि. प.बांधकाम उपविभाग शिरपुर यांनी मा कार्यकारी अभियंता जि प बांधकाम विभाग धुळे यांच्या आदेशाला दाखवला ठेंगा.
बलकुवे येथे गावात दिनांक 28/06/2022 रोजी डॉ बी आर आ यो अंतर्गत मागासवर्गीय वस्तीत क्राक्रीटीकरण चे काम चालू होते.
परंतु सदर काम नित्क्रुष्ट दर्जाचे होत असल्याबाबत मी पंचायत समिती शिरपूर येथे गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद धुळे,नियोजन समीती जिल्हा धुळे येथे संबधीत कामाची दिनांक 30/06/2022 व दिनांक 04/07/2022 रोजी ईमेल ने सदर कामाची चौकशी केल्याशिवाय ठेकेदाराला बिल देण्यात येऊ नये.अशी तक्रार केली होती.
तरी मा कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद धुळे यांनी दिनांक 08/07/2022 रोजी उप अभियंता जि प बांधकाम उपविभाग शिरपूर यांना पत्र पाठवून संबधीत कामाची चौकशी करुन वस्तुनिष्ठ अहवाल ह्या कार्यालयात सादर करावा विलंब टाळावा तसेच चौकशी केल्याशिवाय ह्या कार्यालयात देयक सादर करण्यात येऊ नये असे कळवले आहे.
परंतु शिरपूर येथील उप अभियंता जि प बांधकाम विभाग येथील अधिकारी संबधीत ठेकेदाराची पाठराखण करत व बांधकाम विभागातील भोंगळ कारभार उघड होऊ नये.
म्हणून दोन महिने होऊन सुद्धा त्या कामाची चौकशी करण्यास टाळाटाळ करत आहेत. व ईमेल केलेल्या तक्रारीवरती केलेली कार्यवाही ची माहिती संदर्भात माहिती अधिकार अर्ज करुन माहिती मागीतली असता तिस दिवसात माहिती देणे बंधनकारक असुन सुद्धा बांधकाम उपविभाग शिरपूर येथील जनमाहिती अधिकारी यांनी मुदतीत हेतुपूर्वक माहिती देण्यास टाळाटाळ करुन माहिती अधिकार कायदा ची पायमल्ली केली आहे व वरीष्ठांचे आदेश असुन सुद्धा त्यांनी चौकशी न करता त्यांच्या आदेशाला ठेंगा दाखवला आहे.
तरी त्या संदर्भात मी विभागीय आयुक्त नाशिक यांचे कडे तक्रार दाखल केलेली आहे तरी मा विभागीय आयुक्त हे काय कारवाई करणार याचे कडे लक्ष लागले आहे.
माधवराव फुलचंद दोरीक बलकुवे
माहिती अधिकार कार्यकर्ता.