Crores of rupees scam in cow distribution to tribals आणखी एका प्रशिक्षणार्थीचा प्रताप, आयएएस शुभम गुप्तांकडून भ्रष्टाचाराचा ‘गोपाळकाला’
गडचिरोलीत आदिवासींच्या गाय वाटपात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आदिवासी खात्याचा ठपका, कारवाईची शिफारस, सध्या सांगलीत कार्यरत.
गडचिरोली : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरने केलेले कारनामे चर्चेत असताना आता गडचिरोलीतील एका आयएएस अधिकाऱ्याचे प्रशिक्षणार्थी कालावधीतील कारनामे उजेडात आले आहेत. आदिवासींच्या गाय वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शुभम गुप्ता असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील अपर आयुक्तांनी याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला अहवाल दिला असून, त्यात संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस केली आहे.
सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता है प्रशिक्षणार्थी असताना गडचिरोलीतील अतिदुर्गम व नक्षलप्रभावित भामरागडच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कार्यरत होते. वर्षभरापूर्वी भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून आदिवासी लाभार्थीना दुधाळ गायी वाटपाच्या योजनेंतर्गत लाभ दिला होता. मात्र, गाय घेण्यासाठी मंजूर निधी लाभार्थीच्या खात्यातून इतरत्र वळविण्यात आल्याचे समोर आले होते.
याबाबत तक्रारी झाल्या व माध्यमांतूनही हा विषय समोर आला. यानंतर आदिवासी विभागाने चौकशी समिती नेमली होती. समितीने लाभार्थी, कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जवाब नोंदवत अहवाल शासनाकडे सादर केला.
पूजा खेडकरचे कारनामे सध्या गाजत असतानाच शुभम गुप्ता यांचे प्रताप उघड झाल्याने प्रशासकीय सेवेत येणारी नवी पीढी कोणता आदर्श ठेवून असते, ही चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
धमक्या अन् नियमबाह्य कामे जिथे गेले तिथे वादाच्या भोवऱ्यात अहवालात तपशीलवार माहिती नमूद असून, कथित गाय वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचा आरोप शुभम गुप्ता यांच्यावर ठेवण्यात आला.
बोगस पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सह्या जोडल्याचाही ठपका त्यांच्यावर आहे. इतकेच नव्हे तर कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीदेखील गुप्ता यांनी धमकावून आमच्याकडून नियमबाह्यपणे काम करून घेतले, असाही धक्कादायक दावा केला आहे.
तब्बल वर्षभरानंतर हा चौकशी अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे सोपविण्यात आला आहे. माझ्यावरील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. या प्रकरणाबाबत मी शुभम गुप्ता यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. आमदार डॉ. देवराव होळी यांनी गुप्ता हे कंत्राटदारांना धमकावून लाच मागत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दोन वर्षांनंतर याही प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
• आरोग्य आणि परिवहन विभागाचा नकारात्मक अभिप्राय असतानाही गुप्ता यांनी लाखो रुपये खर्च करून तांत्रिकदृष्ट्या अयोग्य अशा दुचाकी रुग्णवाहिका खरेदी केल्या होत्या. सध्या त्या धूळखात पडून आहेत.
• त्यानंतर ते धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले. त्याही ठिकाणी त्यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर आक्षेप घेत अविश्वास आणण्यात आला होता.
शासनाला अभिप्राय कळविला आहे. वास्तविक या प्रकरणाची चौकशी करताना माझी बाजू मांडण्याची कोणतीही संधी दिलेली नाही. या प्रकरणात कोणतेच तथ्य नसल्याचे दिसून येईल. शासन योग्य निर्णय घेईल.- शुभम गुप्ता, आयुक्त, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका.
Rakesh Dedya Pawara
Nimkhadi post rajbardi tel akarani sith nandurbar