डॉ. आकाश पाडवी यांचा गावकऱ्यांनी केला सत्कार.
प्रतिनिधी, शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील फत्तेपूर (फॉरेस्ट) येथील रहीवाशी डॉ. आकाश पाडवी यांनी वैद्यकीय शाास्त्रातील एमबीबीएस पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली. मुंबई येथे झालेल्या पदवीदान सोहळ्यात कायदेतज्ञ एड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते त्यांना गौरवान्वित करण्यात आले.
तर गावातील तरूण मुंबईच्या नायर हॉस्पिटल मधून डॉक्टर झाल्याबद्दल ग्राम पंचायत फत्तेपूर व गावकरी मिळून डॉ. आकाश पाडवी यांचा शाल व नारळ देऊ सत्कार केला.
तालुक्यातील दुर्गम भागातील फत्तेपूर येथील प्राथमिक शिक्षक असलेल्या अर्जुन पाडवी यांचे चिरंजीव डॉ. आकाश पाडवी यांनी जिल्हा परिषद शाळा कोडीद येथून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
तर मोराणे मिलीटरी हाइस्कूल मधून 10 वी तर सातपुडा हाइस्कूल मधून 12 वी झाले. आणि टोपीवाला नेशनल मेडीकल कॉलेज (नायर) मुंबई येथून वैद्यक शास्रातील एमबीबीएस पदवी मिळवली. या यशाबद्दल ग्राम पंचायत फत्तेपूर (फॉरेस्ट) व गाववासी मिळून डॉ. आकाश पाडवी व आई – वडीलांचा यथोचित सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक अशोक पाडवी यांनी केले तर औषध निर्माण अधिकारी संतोष पवार यांनी आभार मानले.
यांची उपस्थिती.
डॉ. आकाश पाडवी यांचा गावकऱ्यांनी केला सत्कार. |
विद्याविहार सोसायटीचे अध्यक्ष अशोक कलाल, पंचायत समितीचे माजी सभापति नारायण पवार, सरपंच ममताबाई मुखडे, अर्जुन पावरा, पोलीस पाटील शांतीलाल पावरा, कुंभीपाडा पोलीस पाटील राजाराम पावरा, अशोक पाडवी, औषध निर्माण अधिकारी संतोष पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.