Duties of Police Patils- The work of the police Patils. |
शासन एका गावात एक किंवा अधिक पोलीस पाटील यांची नेमणूक करू शकतो. गावातील कोतवाल पोलीस पाटील अखत्यारीत असतील. पोलीस पाटील हे ग्राम पोलिस प्रमुख म्हणून काम करतात.
पोलीस पाटलांचे कर्तव्य- म. ग्रा. पो. अ. 1967 कलम 6 अन्वये.
पोलीस पाटलांचे कर्तव्य. खालील प्रमाणे आहे.
1) पोलिस पाटलाच्या नेमणुकीचे गाव ज्या कार्यकारी दंडाधिकारी च्या हद्दीत असेल त्या कार्यकारी दंडाधिकारी चे आदेशाचे पालन करणे.
2) कार्यकारी दंडाधिकारी चा मागणीनुसार अहवाल सादर करणे.
3) फौजदारी गुन्हे गावातील सार्वजनिक आरोग्य व गावातील समुदायांची सर्वसाधारण माहिती कार्यकारी दंडाधिकारी कळविणे.
4) पोलीस अधिकाऱ्यांना त्याच्या कामात शक्यतो सर्व मदत करणे.
5) कार्यकारी दंडाधिकारी व पोलिस अधिकारी यांनी सूचित केलेल्या कामांचे ( वारंट बजावण्यात ई.) अनुपालन करणे.
6) सार्वजनिक शांतता अभंगाची शक्यता कार्यकारी दंडाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांना कळविणे.
7) जुने प्रतिबंध सार्वजनिक उपद्रव प्रतिबंध गुन्हेगारांचा तपास यंत्रणेला सहाय्यक करणे.
8) शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे.
पोलीस नियम.
पोलीस नियम पुस्तिका 1959 खंड 3 नियम 493 2 अ अन्वयेकानबाई – आजारी प्रवाशांची काळजी घेणे.
पोलीस नियम पुस्तिका 1959 खंड 3 नियम 493 2 ब अन्वये निखात निधी सापडल्यास सक्षम अधिकाऱ्यास कळवणे.
निवृत्ती वेतन धारिया ची मयत झाल्यास सक्षम अधिकाऱ्यास कळवणे
पोलीस नियम पुस्तिका 1959 खंड तीन नियम 493 तीन अन्वये नोका भंग झाल्यास कलशांना व प्रवाशांना मदत करणे.
ज्या गावात आला की नाही त्या गावात नैसर्गिक आपत्ती असल्यास मदत करणे आणि सक्षम अधिकार्यास कळवणे.
आणीबाणीच्या काळात गावातील रेल्वेमार्ग पोल तारा यांचे संरक्षण करणे.
गावात झालेल्या आकस्मित मळ्यात अपघात संशयास्पद मृत्यू,बेवारस, प्रेत,टोळ्या, गुन्हेगार यांची माहिती सक्षम अधिकाऱ्यास कळवणे.
गावात रात्रीचे ग्रस्त करणे.
वरील बाबीवरून पोलीस पाटील हा गावातील प्रशासकीय यंत्रणा व पोलीस यंत्रणा गावातील दुवा म्हणून काम करतात ते लक्षात घेणे.
पोलीस पाटील यांच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती महाराष्ट्र शासनाचा असलेला जीआर आहे.
गाव माहिती रजिस्टर यामध्ये गावाच्या संपूर्ण माहिती लोकसंख्या गावात कोणत्या जाती धर्माचे लोक राहतात गावाचे देवस्थाने, मज्जित, मंदिरे, चर्च प्रेक्षणीय स्थळे,उत्सव इत्यादी. माहिती ठेवावी.
प्रथम खबर रजिस्टर- पोलीस नियम पुस्तिका 1959 नियम 128 अन्वये हे रजिस्टर संबंधित पोलीस ठाण्यामार्फत सही शिक्का, व अनुक्रमांक टाकून पुरवण्यात येते ठाण्यात पोलीस पाटील यांनी दिलेली माहिती खबरीची नोंद या रजिस्टरमधील पानांचे दोन भाग असतात दोन पानांमध्ये छिदे पडलेली असतात. ज्यामुळे या दोन भागांपैकी एक पान फाडून वेगळे करणे शक्य होते.मिळालेली प्रथम खबर लिहून त्याचा एक भाग पोलीस ठाण्यात द्यायचा असतो.
भटक्या टोळ्यांचे रजिस्टर पोलीस नियम पुस्तिका 1959 नियम 127 अन्वये बाहेरच्या गावातून शेजारच्या जिल्ह्यातून अथवा अन्य ठिकाणाहून गावात आलेल्या भटक्या आठवड्यांची भिकाऱ्यांची फकीर बैरागी हे रस्ते यांच्याकडे चौकशी करून त्यांची सविस्तर नोंद यात ठेवावी. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात कळवावे.
आवक जावक – रजिस्टर यात पोलीस पाटलांकडे येणारी कागदपत्रे व पोलीस पाटील ने पाठवलेले कागदपत्रे यांची सविस्तर नोंद घ्यावी.
हिस्ट्री सीटर रजिस्टर – यात संबंधित पोलिस ठाण्यात नोंद असणाऱ्या सराईत गुन्हेगारांची माहिती व सविस्तर वर्णन सेवावे यापैकी कोणी गावाचा धरले असता तर संबंधित पोलिस ठाण्यात कळवावे.
गुन्हा रजिस्टर- गावात घडणार्या गुन्ह्यांची सविस्तर नोंद रजिस्टर मध्ये होत असते.
अकस्मात घटना रजिस्टर – गावात होणार्या तस्मात मृत्यू अपघात आत्महत्या यांची सविस्तर नोंद ठेवावी याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात कळवावे.
राजकीय हालचाल रजिस्टर – गावात विविध राजकीय पुढारी,राजकीय पक्ष, नेते, संसद सदस्य मंत्री इतर समित्यांवर निवडून जाणाऱ्या व्याप्ती यांची सविस्तर नोंद ठेवावी याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात कळवावे
चौकशी रजिस्टर – विविध अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलास करावयास सांगितलेल्या चौकशी माहिती या रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी.
भेट रजिस्टर- विविध अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलास करावयास सेंड केल्या चौकशी माहिती या रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी.
तंटामुक्ती जबाबदारी-
सध्या महाराष्ट्र शासन महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम मोहीम राज्यात चालू केली असून या कमिटीत पदसिद्ध सचिव म्हणून पोलीस पाटलांचे काम पाहावे लागते.
हेही वाचा – तंटामुक्ती विषयी संपूर्ण माहिती
वरील तरतुदीचे वाचन केल्यानंतर असे लक्षात येते की पोलीस पाटलांचे आणि कर्तव्य आहेत पण ते सक्षम नियंत्रणाचा अभाव प्रशिक्षण मिळावे वरिष्ठ अधिकाऱ्यांची पोलीस पाटलांचे नियमित सभा न घेणे त्यांच्या दप्तराची तपासणी ना करणे अशा अन्य अनुषंगाच्या कारणामुळे पोलीस पाटलांनी वरील प्रशासनाचे व पोलिसांचे नियंत्रण कमी होत आहे.
वरील तरतुदींचे काटेकोर अनुपालन करण्याची सक्ती केल्यास वेडी पोलिस पाटलांची सहभाग घेणे प्रशिक्षण देणे या गोष्टी केल्यास त्यांच्यावर निश्चितच नियंत्रण ठेवता येईल.
माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत पोलीस पाटील यांची माहिती 2005 पासून ते आज पर्यंत वरील दिलेल्या मुद्दे टाकून माहिती मांगू शकता.
माहिती चा अधिकार माहिती मागणाऱ्या अर्जदारस त्याने केलेल्या अर्जनुसार सर्व संदर्भ माहिती उपलब्ध करून द्यावी असे सूचित आले आहे.