पर्यावरण दिनानिमत्त शिरपूर तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी, शिरपूर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहाय्यक वनसंरक्षक आनंद मेश्राम यांच्या पुढाकराने तालुक्यात विविध गावात पर्यावरण जागृतीपर कार्यक्रम सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून तालुक्यातील खंबाळे, आंबे, खैरखुटी, उमर्दा, मालकातर, चाकडू येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती, नियतक्षेत्र परिमंडळ व ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने My lifestyle for environment या विषयावर पर्यावरण जागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला.
पर्यावरण जनजागृती या विषयावर शिरपूर तालुक्यातील खंबाळे, आंबे, खैरखुटी, उमर्दा, मालकातर, चाकडू येथे कार्यक्रम घेण्यात आला. सदर गावातील लोकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. आनंद मेश्राम सहाय्यक वनसंरक्षक यांनी पर्यावरणाचे फायदे सांगितले तसेच झाडे लावा, प्लॅस्टिकचा वापर टाळा, जंगल वाचवा, कॉटनच्या पिशव्या वापरावे असे आवाहन त्यांनी केले.
खंबाळे, आंबे, खैरखुटी, उमर्दा, मालकातर, चाकडू ग्रामपंचायत हद्दीत वनविभागा मार्फत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे शेवटी पर्यावरण प्रतिज्ञा (शपथ) घेण्यात आली.
यांची उपस्थिती.
आनंद मेश्राम सहाय्यक वनसंरक्षक, वनपाल बी.ए. महाले, वनरक्षक शंकर पावरा, आंबे सरपंच मिनाक्षी पावरा, ग्रामसेवक विलास भोई, सामाजिक कार्यकर्ता शिवाजी पावरा, प्रितम पावरा, तुकाराम पावरा, वनरक्षक स्वप्नील पाटील, वनपाल भदाणे, इनेश पावरा, सुनिता पावरा व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.